जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

शहरातील या उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी हाट’ला कोपरगावकरांचा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आ योजनांच्या वतीने करण्यात आला आहे. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी हजेरी लावल्याने ‘दिवाळी हाट’ मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  

  "स्थानिक व्यावसायिकांना आपल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या व्यवसायालाही चालना मिळत आहे.‘दिवाळी हाट’ला नागरिकांनी आवर्जून भेट देत स्थानिक व्यावसायिक आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले,ही आनंदाची बाब आहे.या उपक्रमामुळे स्थानिक व्यावसायिकांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे"-पुष्पाताई काळे,अध्यक्षा,प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ,कोपरगाव.

   दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक वस्तू,सजावटीचे साहित्य,आकाशकंदील,पणत्या,फराळाचे पदार्थ,कपडे तसेच विविध दैनंदिन गरजेच्या वस्तूंनी ‘दिवाळी हाट’ सजला आहे.एकाच ठिकाणी विविध वस्तू खरेदी करण्याची सुविधा मिळत असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाला पसंती दिली जात आहे.स्थानिक व्यावसायिकांना आपल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या व्यवसायालाही चालना मिळत आहे.‘दिवाळी हाट’ला नागरिकांनी आवर्जून भेट देत स्थानिक व्यावसायिक आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले,ही आनंदाची बाब आहे.या उपक्रमामुळे स्थानिक व्यावसायिकांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे.भविष्यातही नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य देऊन व्यावसायिक आणि महिला बचत गटांना सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close