गुन्हे विषयक
स्कुटीतून गोमांस विक्री,पोलिसांनी डाव उधळला !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात आज सकाळी 10.35 वाजेच्या सुमारास गोवंश हत्या बंदी असतानाही तीन आरोपी अनुक्रमे शफिक रफिक कुरेशी (वय-५१ वर्षे),मोबीन खालीद कुरेशी (वय-२८ वर्षे )दोघे रा.संजयनगर कोपरगाव,मुजाहिद मजिद कुरेशी (वय-२८ वर्षे) रा.आयशा कॉलनी,कोपरगाव आदींनी आपल्या स्कूटी मध्ये लपवून जवळपास 01 लाख 05 हजार रुपये किमतीचे गोवंश मांस घेऊन जाताना आढळून आले असून याबाबत पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे काळात ऐन शिवरात्रीच्या दिवशी मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली होती.ती कारवाई राज्यभर गाजली होती.याच ठिकाणाहून गोवंश कत्तल करून सदर माल संगमनेर मार्गे गुजरात पर्यंत जात असल्याची बाब उघड झाली होती.मात्र एवढ्या कारवाया होऊनही त्यांचेवर सुतराम फरक होताना दिसून येत नाही हे विशेष ! शिवाय हा सर्व प्रकार गोदावरी नदीच्या काठी होत असून या कत्तलीचे रक्त मिश्रीत पाणी पवित्र समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत जात असून त्या खाली अनेक तीर्थक्षेत्र आहे.मात्र या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासन केंव्हा घेणार या प्रश्न पडला आहे.
कोपरगाव तालुक्यात वाढती गोवंश हत्या आणि अवैध वाहतूक ही खरोखरच एक अत्यंत चिंताजनक आणि गंभीर समस्या बनली आहे.सामाजिक,आर्थिक आणि धार्मिक दृष्टीने या समस्येचे मोठे पडसाद उमटत असून,स्थानिक नागरिक आणि गोरक्षकांकडून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.काही महिन्यांपूर्वी कोपरगाव शहर पोलिसांनी दोन कंटेनरमधून सुमारे १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे तब्बल १८ टन गोमांस जप्त केले होते,ज्यामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.ऑक्टोबर २०२६ मध्येच कोपरगाव शहरातील खडकी नाका आणि निवारा कॉर्नर भागात पिकअप वाहनातून अवैधपणे गोवंशाची वाहतूक करताना पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला होता. तसेच,गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी विविध कारवाया करून अनेक जनावरांची सुटका केली आहे.वाढत्या तक्रारींची दखल घेत मे २०२६ मध्ये कोपरगाव पालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून कोपरगावातील संजयनगर परिसरातील अवैध गोवंश कत्तलखान्यांच्या बांधकामांवर बुलडोझर चालवून ते उद्ध्वस्त केले होते.महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही,कोपरगावातील संजयनगर,आयेशा कॉलनी आणि सुभाषनगर यांसारख्या उपनगरांमध्ये वारंवार अवैध कत्तलीच्या घटना समोर येत आहेत.कायद्याची पुरेशा प्रमाणात अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे काळात ऐन शिवरात्रीच्या दिवशी मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली होती.ती कारवाई राज्यभर गाजली होती.याच ठिकाणाहून गोवंश कत्तल करून सदर माल संगमनेर मार्गे गुजरात पर्यंत जात असल्याची बाब उघड झाली होती.मात्र एवढ्या कारवाया होऊनही त्यांचेवर सुतराम फरक होताना दिसून येत नाही हे विशेष ! शिवाय हा सर्व प्रकार गोदावरी नदीच्या काठी होत असून या कत्तलीचे रक्त मिश्रीत पाणी पवित्र समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत जात असून त्या खाली अनेक तीर्थक्षेत्र आहे.मात्र या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासन केंव्हा घेणार या प्रश्न पडला आहे.अशीच एक घटना आज सकाळी संवत्सर शिवारात उघड झाली असून यातील आरोपी हे आपल्या दुचाकीच्या डिकीतुन गोमांस घेऊन जात असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी आरोपीवर पाळत ठेवली होती.त्यानुसार केलेल्या कारवाईत ते अलगत अडकले असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान यात आरोपी मुजाहीद मजिद कुरेशी याचे ताब्यातील पांढ-या काळ्या रंगाची सुझुकी कंपनीची बर्गमॅन स्कुटी (क्र.एम.एच.१७-डी.एफ.-२२८१) हि आणि सुमारे २५ हजार रुपये किमतीची स्कूटी वापरली तर आणखी एक स्कूटी (क्र.एम.एच.-१७-डी.एफ-२२८ )काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये गोमांस जातीचे जनावरांचे अंदाजे २५ किलो गोमांस विक्री करण्यासाठी घेऊन जाताना आढळून आले आहे.त्यांची एकूण किंमत १०० रुपये किलो दराप्रमाणे अंदाजे १ लाख ०५ हजार इतकी आढळून आली आहे.या घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचेसह सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे आदींनी भेट दिली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 616/2025 भारतीय न्यास संहीता कलम ३२५,३(५) सह महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,५(क),९(अ),११ सह मोटार वाहन कायदा कलम १३०/१७७,वाहतूक कायदा कलम १३०/१७७,प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल जालिंदर तमनर हे करत आहेत.



