जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

ज्ञानेश्वर डांबरे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


संवत्सर (प्रतिनिधी)

  कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील रहिवासी ज्ञानेश्वर धर्मा डांबरे (वय ३७ वर्षे) यांचे काल सायंकाळी ५.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

  कै.ज्ञानेश्वर डांबरे यांचे छायाचित्र.

कै.ज्ञानेश्वर डांबरे हे गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाहन चालक म्हणून दूध वाहतूक करण्याचे काम करीत होते.अतिशय कष्टाळू आणि कामाशी नेहमी प्रामाणिक असणारे वाहन चालक म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे होते.आपल्या धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.

    कै.ज्ञानेश्वर डांबरे हे गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाहन चालक म्हणून दूध वाहतूक करण्याचे काम करीत होते.अतिशय कष्टाळू आणि कामाशी नेहमी प्रामाणिक असणारे वाहन चालक म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे होते.आपल्या धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.नाना या टोपण नावाने ते सर्वांच्या परिचित होते.त्यांच्या पश्चात आई -वडील तसेच समाधान डांबरे हे बंधू,दोन भगिणी,पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे.हृदयविकारासारख्या धक्क्याने त्यांचे झालेले निधन सर्वांनाच चटका लाऊन गेले.गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रातही त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर व लक्ष्मणवाडी पंचक्रोशीतील अनेक मित्रपरिवार, नातेवाईक,विविध क्षेत्रातील मान्यवर,गोदावरी दूध संघाचा परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   कै.ज्ञानेश्वर डांबरे यांच्या निधनाचे वृत्त कळताच गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,माजी सरपंच सुलोचना ढेपले,माजी उपसरपंच विवेक परजणे यांनी शोक व्यक्त केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close