शैक्षणिक
गरज म्हणून सुरू झालेला मोबाईल व्यसनात रुपांतरित होणे चिंताजनक-…पोलिस निरीक्षक

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुणाईमध्ये व लहान मुलांमध्ये क्रॉनिक डिप्रेशनची लक्षणे वाढताना दिसत आहेत.गरज म्हणून सुरू झालेला वापर कधी सवयीत आणि शेवटी गंभीर व्यसनात बदलतो हे लक्षातही येत नाही.वर्तमान युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग असून याचे जितके फायदे आहेत तितके तोटे देखील असल्याचे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

“सतत खाली मान करून फोन पाहिल्याने मान,खांदे आणि पाठीच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो.रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे निद्रानाश,थकवा आणि मेंदूला विश्रांती न मिळाल्याने डोकेदुखी सुरू होते.मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींमुळे मेंदूची कार्यक्षमता मंदावणे,स्मरणशक्ती कमी होणे आणि दीर्घकाळात गंभीर आजारांचा धोका संभवतो”- उद्धव डमाळे,पोलिस निरीक्षक,कोपरगाव शहर पोलिस ठाणे.
कोपरगाव नजीक गोदावरी नदी काठी असलेल्या के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले आहे त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब सोनवणे,प्रा.संदीप जगझापआदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण येतो,डोळे कोरडे पडतात,लालसरपणा वाढतो आणि दृष्टी कमी होऊ शकते.सतत खाली मान करून फोन पाहिल्याने मान,खांदे आणि पाठीच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो.रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे निद्रानाश,थकवा आणि मेंदूला विश्रांती न मिळाल्याने डोकेदुखी सुरू होते.मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींमुळे मेंदूची कार्यक्षमता मंदावणे,स्मरणशक्ती कमी होणे आणि दीर्घकाळात गंभीर आजारांचा धोका संभवतो.कोणत्याही ध्येयापर्यंत जाताना अथक परिश्रम गरजेचे असते,तसेच निश्चित ध्येय असणे सुद्धा गरजेचे असते.ते लवकरात लवकर ओळखणे हे लाभदायक ठरते.मात्र आपल्या करिअरच्या या प्रवासात मोबाईलचा अती वापर,इंटरनेटचा चुकीचा वापर तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा धोका हे देखील आव्हान आपण ओळखले पाहिजे आणि त्याबाबत सजग असले पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी केले आहे त्यावेळी त्यांनी,”महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलली जात आहेच,त्यासोबतच महाविद्यालयाच्या संरक्षणाच्या दृष्टीने कोपरगाव पोलिस दलाचे नेहमीच सहकार्य राहिले आहे,त्याबद्दल महाविद्यालय नेहमीच कृतज्ञ असल्याच्या भावना बोलकं दाखवल्या आहेत.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जावेद शहा यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.संदीप जगझाप यांनी मानले आहे.



