जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
भूजल प्रदूषण

…या गावात सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 

  कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीतील एस.एस.मिल्कच्या सांडपाण्यावर इ.टी.पी.प्लांटद्वारे प्रक्रिया करून त्या पाण्याचा उपयोग करून प्रकल्प परिसरातील झाडांना उपयोग केला असल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक सचिन दिलीप रहाणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

बहादरपूर येथील एस.एस.मिल्क यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (इ.टी.पी.प्लांट ) सुरू केला त्यावेळी कैलास रहाणे,सचिन रहाणे आणि इतर मान्यवर दिसत आहे.

कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील एस.एस.मिल्क यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (इ.टी.पी.प्लांट ) सुरू केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांनी त्यातून प्रक्रिया केलेल्या पाण्यातून वृक्षांना पाणी देणें सुरू केले असून त्या पर्यावरण पूरक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या बगीचाला सचिन रहाणे यांनी आपल्या आईचे स्मरणार्थ “आशाई गार्डन” हे नाव दिले आहे.

   सांडपाण्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्राद्वारे (इ.टी.पी.प्लांट) प्रक्रिया करणे हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.कारखाने,उद्योग आणि व्यावसायिक संस्थांमधून निघणाऱ्या विषारी आणि प्रदूषित पाण्याला शुद्ध करण्यासाठी या प्लांटचा वापर केला जातो.दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाणारी नवनवीन रसायने व उत्पादनांत सातत्याने वाढ होत आहे.त्यांचे प्रमाण सांडपाण्यामध्ये वाढत आहे.सामान्यतः सर्व सांडपाणी एकाच ठिकाणी वाहून आणून त्यासाठी प्रक्रिया केंद्र उभारण्याची प्रचलित पद्धत आहे.परिणामी दूषित पाणी नदी किंवा नाल्यात न सोडल्यामुळे भूजल प्रदूषण टळते आणि जलचरांचे रक्षण होते.प्रक्रिया केलेले पाणी बागेसाठी,फ्लशिंगसाठी किंवा कारखान्यातील इतर कामांसाठी पुन्हा वापरता येते.शासकीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पाळण्यास मदत होते.नेमकी हीच गरज ओळखून कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील एस.एस.मिल्क यांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (इ.टी.पी.प्लांट ) सुरू केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांनी त्यातून प्रक्रिया केलेल्या पाण्यातून वृक्षांना पाणी देणें सुरू केले असून त्या पर्यावरण पूरक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या बगीचाला सचिन रहाणे यांनी आपल्या आईचे स्मरणार्थ “आशाई गार्डन” हे नाव दिले आहे.त्यांच्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   सदर प्रसंगी कोपरगाव तालुका भाजपचे माजी तालुकाध्यक्ष कैलास रहाणे,एस.एस.मिल्कचे अध्यक्ष सचिन रहाणे,बहादरपूर ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ रहाणे,संतोष रहाणे,रुद्र संकलन केंद्राचे संचालक शिवहरी रहाणे,शशिकांत झिंजुरडे,गणेश चिने आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close