जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

… हॉलिबॉल स्पर्धेत या संघाचे मोठे यश !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
 
  कोपरगाव तालुक्यातील गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या हॉलीबॉल संघाने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेत विजय मिळवला आहे.चिपळूण येथे २८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत शाळेचा संघ प्रथमच पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करणार असून,१२ खेळाडूंचा हा संघ प्रशिक्षक राजेंद्र आढाव व इसाक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.

  

दरम्यान या स्पर्धेत अहिल्यानगर,सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी झाले असून,गौतम पब्लिक स्कूलचे १४ व १७ वर्षांखालील मुलांचे हॉकी संघही मैदानात उतरले आहेत.दि.२८ रोजी गौतम पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या विभागीय १४ वर्षा खालील मुलांच्या हॉकी स्पर्धेमध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने अंतिम सामन्यामध्ये  सोलापूर जिल्ह्याचा ५-० गोल ने पराभव करून बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत गौतमचा संघ पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे.

   राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या गौतम पब्लिक स्कूलच्या संघातील खेळाडूंमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कु.कल्याणी वावधने,कु.श्रावणी अकोलकर व कु.राजलक्ष्मी निर्मळ,अहिल्यानगर जिल्ह्यातील कु.शिवस्वरा आढाव,तसेच नाशिक जिल्ह्यातील कु.अनुष्का पवार,कु.तेजस्विनी ढोणे,कु.गौरी रायते,कु.प्रज्ञा रायते,कु.आराध्या भागवत,कु.स्नेहा देवरे, कु.स्नेहल कुरणे व कु.सायली शिंदे यांचा समावेश आहे.

   दरम्यान,गौतम पब्लिक स्कूलमध्ये बुधवार दि.२८ ऑक्टोबर पासून शालेय विभागीय हॉकी स्पर्धेलाही सुरुवात झाली आहे.प्राचार्य नूर शेख व सोलापूरचे माजी क्रीडा मार्गदर्शक जरार कुरेशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे.या स्पर्धेत अहिल्यानगर,सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी झाले असून,गौतम पब्लिक स्कूलचे १४ व १७ वर्षांखालील मुलांचे हॉकी संघही मैदानात उतरले आहेत.दि.२८ रोजी गौतम पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या विभागीय १४ वर्षा खालील मुलांच्या हॉकी स्पर्धेमध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने अंतिम सामन्यामध्ये  सोलापूर जिल्ह्याचा ५-० गोल ने पराभव करून बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत गौतमचा संघ पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे.या स्पर्धेवेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी विशाल गर्जे उपस्थित होते.उद्या १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या विभागीय हॉकी स्पर्धा होणार आहेत.

दरम्यान या यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,चैताली काळे,संस्था निरीक्षक नारायण बारे,प्राचार्य नूर शेख यांचेसह संस्थेचे सर्व सदस्य व पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close