जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

शेतपाणंद रस्त्यांच्या समन्वयक सदस्यांची निवड जाहीर !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कोपरगाव तालुका समन्वयक सदस्यपदी व्यंकट धट आणि शंकर फटांगरे यांनी नुकतीच निवड करण्यात आली आहे.त्यांचे शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी अभिनंदन केले आहे.

 

प्रत्येक विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत ५ प्रगतशील शेतकऱ्यांची सदस्य म्हणून निवड केली जात आहे.उपविभागीय अधिकारी हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून पात्र शेतकऱ्यांची यादी मागवतात आणि त्यानंतर अंतिम निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेतली जाते.या समितीचे अध्यक्ष स्थानिक आमदार असतात.ग्रामीण भागातील शेत रस्त्यांचे प्रश्न वेगाने मार्गी लावण्यासाठी या समित्या समन्वय साधण्याचे काम हे सदस्य करणार आहे.

    मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि कामांमध्ये वेग आणण्यासाठी राज्य शासनाने तालुका तथा विधानसभा क्षेत्र व जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये अशासकीय आणि प्रगतशील सदस्यांची निवड करण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.प्रत्येक विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत ५ प्रगतशील शेतकऱ्यांची सदस्य म्हणून निवड केली जात आहे.उपविभागीय अधिकारी हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून पात्र शेतकऱ्यांची यादी मागवतात आणि त्यानंतर अंतिम निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेतली जाते.या समितीचे अध्यक्ष स्थानिक आमदार असतात.ग्रामीण भागातील शेत रस्त्यांचे प्रश्न वेगाने मार्गी लावण्यासाठी या समित्या समन्वय साधण्याचे काम हे सदस्य करणार असून कोपरगाव तालुक्यातील या दोन सदस्यांची निवड जाहीर झाली आहे.दरम्यान कोपरगाव तालुका समन्वयक सदस्यपदी निवड झालेले नवोदित सदस्य व्यंकट धट आणि शंकर फटांगरे यांचे अहिल्यानगर शिवपानंद शेतरस्ते चळवळीचे जिल्हा समन्वयक दादासाहेब जंगले यांसेसह ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.या सदस्यांच्या निवडीमुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेत रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळणार असल्याचे मानले जात आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close