जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात विविध विकास कामांचे उद्घाटन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील ४ कोटी ६ लक्ष निधीपैकी पहिल्या टप्प्यातील प्रभाग क्रमांक ४,७,१० आणि १४ मधील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आ.विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती हाती आली आहे.यात शहरातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा,सांडपाणी व्यवस्थापन,परिसराचे सुशोभीकरण आदी कामांचा समावेश असल्याची माहिती आहे.

दरम्यान गुणवंत रस्त्याबाबत तालुक्याचा चांगला लौकित नाही त्यामुळे गुणवत्ता पूर्ण कामे होणे गरजेचे असून ही कामे कशी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देताना नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. दर्जेदार रस्ते,प्रभावी सांडपाणी व्यवस्थापन आणि सुधारित नागरी सुविधांमुळे संबंधित परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

  कोपरगाव शहरांसह तालुक्यातील रस्त्यांची मोठी परवड झाली असून त्या साठी मोठ्या निधीची गरज आहे.त्यासाठी लोकप्रतिनिधींनी निधी आणणे गरजेचे असल्याचे वारंवार उघड झाले आहे.त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून नुकताच कोपरगाव येथील विविध विकास कामांना निधी मिळाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यात तुळजा भवानी मंदिर ते भुसारी मार्गाच्या विकासासाठी २६ लाख २५ हजार ९३२ रुपये,सप्तर्षी मळा येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ८ लाख ४८ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. किसन जाधव घर ते नंदू घोडेराव घर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ७ लाख ८६ हजार रुपये, बाळासाहेब पोकरे घर ते संजय माळी घर रस्त्यासाठी ७ लाख ९६ हजार ६०० रुपये, तर किशोर थोरात घर ते किसन जाधव घर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १२ लाख ६७ हजार २०० रुपये खर्च अपेक्षित आहे.महाबली हनुमान मंदिर परिसराच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख ४०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  दरम्यान यात वाबळे घर ते ढगारे घर या मार्गावर पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १४ लाख ४५ हजार ९०० रुपये आणि श्रद्धानगरी परिसरातील ओपन स्पेसमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ६ लाख ९२ हजार ३०० रुपये खर्च करण्यात येणार आहेत.मुंदडा घर ते अजय क्लॉथ सेंटरपर्यंत भुयारी गटार बांधकामासाठी १४ लाख ९४ हजार ११८ रुपये, तर प्रभाग क्रमांक ७ मधील विविध ठिकाणी गटारी,नाले दुरुस्ती आणि पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ९ लाख ९८ हजार ५१२ रुपये खर्च होणार आहेत.

  दरम्यान गुणवत्ता पूर्ण कामे होणे गरजेचे असून ही कामे कशी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देताना नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. दर्जेदार रस्ते,प्रभावी सांडपाणी व्यवस्थापन आणि सुधारित नागरी सुविधांमुळे संबंधित परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.या कामाचे नगराध्यक्ष पराग संधान,नगरसेवक आदींनी स्वागत केले आहे.दरम्यान शेवटी आभार बांधकाम सभापती निलोफर पठाण यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close