पुरस्कार,गौरव
कोपरगावात…या सेना नेत्यांची अकस्मात भेट?

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
राज्यातील अभ्यासू आणि तितकेच आक्रमक नेते म्हणून शिवसेनेचे आ.भास्कर जाधव यांनी नुकतीच उपचारादरम्यान कोपरगाव येथील राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांचे धन्वंतरी रुग्णालयात भेट दिली असून त्यावेळी त्यांची धर्मपत्नी आणि मुलगी किर्ती पाटील आणि परिवार बरोबर असल्याची माहिती हाती आली आहे.त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सैनिक मनोज कपोते यांच्या घरी भेट दिली असून त्यांचा दोन्ही ठिकाणी सत्कार करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.आ.जाधव यांची मुलगी किर्ती पाटील यांनी डॉ.आव्हाड यांचे नाशिक येथील रुग्णालयात या आधी उपचार घेतले होते.ते प्रभावी ठरल्याने त्यांनी आपले पिताश्री आ.भास्कर जाधव यांना उपचारार्थ आणल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान त्यावेळी कार्यकर्त्यांनी उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा महत्वाचा असणारा अहिल्यानगर-मनमाड (मालेगाव) या राष्ट्रीय मार्गाची झालेली वाताहत आणि अपघातात जात असलेले अनेक प्रवाशांचे बळी याबाबत लक्ष वेधून घेतले आहे.व विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याची विनंती केली आहे.त्यांनी ती मान्य केली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
राज्यातील अभ्यासू आणि तितकेच आक्रमक नेते म्हणून शिवसेनेचे आ.भास्कर जाधव यांची ओळख आहे.आक्रमकता हा जाधव यांचा स्वभाव धर्म मानला जातो.त्यामुळेच विरोधकच नव्हे तर स्वपक्षीयांविरोधातही बंड पुकारताना महाराष्ट्राने त्यांना अनेकांनी पाहिलं आहे.
भास्कर जाधव यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने १९८२ पासून सुरुवात झाली. त्यांनी शिवसैनिक म्हणून पक्षात कामाला सुरुवात केली.१९९५ ते २००४ दरम्यान ते चिपळूणमधून दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले.शिवसेनेत असताना त्यांनी अनेकपदेही भूषवली.जाधव कुशल संघटक मानले जातात शिवाय प्रभावी वक्ते आहेत.जाधव यांना २००४ मध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही.त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली.मात्र,त्यांचा पराभव झाला.त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीतून त्यांनी २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवून तेव्हाचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला.या निवडणुकीनंतर जायटं किलर अशी त्यांची प्रतिमा तयार झाली.ते दांडगा लोकसंपर्क असलेले नेते आहेत.तसेच मराठा समाजातून आल्याने या समाजातील ते लोकप्रिय नेतेही आहेत.वर्तमानात विरोधी पक्षात काम करताना अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला त्यांनी धारेवर धरले असून राज्यातील महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.त्यांचा आजही दबदबा असून त्यांना सरकार गांभीर्याने घेत असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे.

आ.भास्कर जाधव यांचा कोपरगाव येथील धन्वंतरी आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या वतीने डॉ.रामदास आव्हाड यांनी शाल,श्रीफळ देऊन गौरव केला आहे.त्या नंतर उबाठा सेनेचे निष्ठावान सैनिक मनोज कपोते यांचे निवासस्थानी भेट दिली आहे.त्या ठिकाणी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.त्यावेळी वैभव शेलार,पियुष सैंदाने,श्री.साटोटे,शिंदे आदी उपस्थित होते.



