कोपरगाव शहर वृत्त
आगामी काळात मुरुम घोटाळा समोर येणार – राष्ट्रवादीचा दावा !

न्यूजसेवा
कोपरगाव (नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात गटारीवरील ढाप्यांचा भ्रष्टाचारउघड झाला असून नुकताच मोकाट जनावरांचा गैरप्रकार उघड झाला आहे.आता आगामी काळात मुरुम घोटाळा समोर येणार असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेन बोरावके यांनी आज आयोजित एका पत्रकार परिषदेत केले आहे.त्यामुळे हे आणखी काय प्रकरण आहे याबाबत कोपरगाव शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

“आ.काळे गटाचे कोपग्रव नगरपरिषदेत ०३ कोटींची बिले बाकी असल्याने ते अस्वस्थ झाले असल्याचा आरोप सत्ताधारी गटाने केला असल्याची माहिती दिली असता नगरसेवक मंदार पहाडे यांनी,” ते खोटेनाटे आरोप करत असून त्याचा त्यांनी पुरावा द्यावा” अशी मागणी केली आहे.सत्ताधारी मोकाट जनावरे पकडली असल्याचा दावा करत असले तरी ती माहिती खोटी असल्याचा दावा करून अद्याप शहरात जनावरे मोकाट फिरत आहे”,त्यांना ती पकडता येत नाही आणि सोडता येत नाही.शहरातील नागरिकांना बिलांचे काही देणे घेणे नाही”-मंदार पहाडे,माजी नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेस,काळे गट,कोपरगाव.
कोपरगाव नगरपरिषदेतील अनागोंदी कारभार आणि विविध नागरी समस्या हा सध्या स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचा आणि संतापाचा विषय बनला आहे.आठ महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकांनंतर नवीन प्रशासन अस्तित्वात आले असले,तरीही शहरातील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने स्थानिक यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि रखडलेली कामे ‘धुळगाव’ अशी ओळख निर्माण झाली असून त्यात अजूनही पुरेशी सुधारणा झालेली नाही.शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून साईबाबा कॉर्नर ते संजीवनी कारखाना या दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी मंजूर झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीवरून आणि अवघ्या वर्षभरात खराब होणाऱ्या रस्त्यांच्या निकृष्ट दर्जावरून प्रशासनावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप झाले आहेत.नगर-कोपरगाव महामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अर्धनग्न पायी पदयात्रा काढून प्रशासकीय सुस्तीचा निषेध केला आहे.पाणीपुरवठ्याची बिकट समस्या अद्याप नियमित असून गोदावरी नदी आणि कालवा जवळ असूनही कोपरगाव शहराला वेळेवर आणि पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही.शहराची गरज भागवण्यासाठी साठवण तलावाची क्षमता वाढवण्याचा महत्त्वाचा प्रश्न प्रशासकीय उदासीनतेमुळे अद्याप रेंगाळलेला आहे.त्यात कोणतीही प्रगती दिसत नाही.स्विमिंग टँक बांधून अनेक वर्षे उलटूही अद्याप त्याचा वापर होताना दिसून येत नाही.त्यामुळे याचा फायदा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.त्यातच कोपरगाव नगरपरिषदेच्या कारभाराला काळिमा फासणारी धक्कादायक घटना काल मंगळवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी समोर आली.नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे आठ ते नऊ नवजात वासरे व बछडे कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून आणून दुल्हनबाई वस्ती परिसरातील एका वॉल कंपाऊंडमध्ये बेवारस सोडल्याचा आरोप करण्यात आला असताना आज दुपारी चार वाजता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी आज गौतम सहकारी बँके सभागृहात आज पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी हे आरोप केले आहेत.

“आ.काळे यांनी मोरे घर तत्सम विविध कामांसाठी सुमारे ४०,३० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यांनी सत्ताधाऱ्यांनी उद्घाटने केली.मात्र प्रशासनाचे अधिकारी आणि विरोधी नगरसेवक यांना निमंत्रित केलें नव्हते याबाबत त्यांनी कोपरगाव नगरपालिकेला माहिती अधिकारात प्रश्न विचारला होता.त्यात,”पालिकेने उद्घाटन करताना कोणीही प्रशासकीय अधिकारी नव्हता असा नगरपरिषदेने लेखी खुलासा केला असल्याचा दावा केला आहे.व तो कार्यकम त्यांनी बेकायदा केला असल्याचा आरोप केला आहे”-वाल्मीक लहिरे,नगरसेवक,राष्ट्रवादी काँग्रेस,कोपरगाव नगरपरिषद.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे माजी शहर प्रमुख सुनील गंगूले,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेन बोरावके,राजेंद्र वाघचौरे,माजी नगरसेवक मंदार पहाडे,फकीर कुरेशी,सचिन गवारे,नगरसेवक संदीप कपिले,सोमनाथ आढाव,बाळासाहेब रुईकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात हायमॅक्स मंजूर केले आहे.त्याचे उद्या श्रेय घेतील अशी भविष्यवाणी त्यांनी आधीच करून खळबळ उडवून दिली आहे.
यावेळी राष्ट्रवादी आ.काळे गटाचे माजी शहराध्यक्ष सुनील गंगूले म्हणाले की,”०३ दिवसापूर्वी दोन रस्त्यांचे उद्घाटने झाली.त्यात आमच्या नगरसेवकांना निमंत्रण नसल्याचे स्पष्ट केले आहे.वास्तविक प्रशासन आणि सर्व पक्षाच्या नगरसेवकांना निमंत्रण देणे गरजेचे होते.मात्र सत्ताधाऱ्यांनी तसे केले नाही.त्यामुळे त्यांना नगरपरिषद खाजगी मालमत्ता असल्याचे वाटत असल्याचे आरोप त्यांनी केला असून ती खाजगी मालमत्ता नसल्याचा खुलासा करून सत्ताधारी वर्गाला जागा दाखवून दिली असल्याचे मानले जात आहे.

कोपरगाव शहरातील ओमनगर,साईसिटी,भामानगर येथील गणपती मंदिर परिसर,कोजागिरी कॉलनी,घनकचरा व्यवस्थापन डेपो आणि साठवण तलाव क्रमांक ५ या ठिकाणी हायमॅक्स दिवे बसविण्याचे काम पूर्ण झाले तर अहिंसा स्तंभ परिसर,दत्तनगर येथील दत्तमंदिर परिसर,गवारेनगर-गवारे वस्ती,ब्रिजलाल नगर यासह शहरातील एकूण १३ ठिकाणी हायमॅक्स दिवे बसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती आ.आशुतोष काळे गटाच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सत्ताधारी सत्तेत आल्यापासून आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहे.अनधिकृत कामे करत असून ते असे चोर-भामट्यासारखे का वागत आहे असा सवाल केला आहे.शहर विकासासाठी आ.काळे यांनी मोठा निधी आणला आहे.त्यामुळे शहरात परिवर्तन झाले असल्याचा दावा केला आहे.त्यासाठी त्यांनी अनेक विकास कामांची उदाहरणे दिली आहे.तर सत्ताधारी गटाच्या निष्क्रियतेसाठी त्यांनी क्रिडा संकुल असेल,स्विमिंग टँक असे उदाहरणे दिली आहे.तुम्ही प्रयत्न करून निधी आणा आम्ही तुमचे स्वागत आणि सत्कार करू मात्र दुसऱ्यांच्या कामावर फणा काढून दावा करू नका असे आवाहन करून सत्ताधारी गटाने ब्राम्हण समाजाच्या कार्यक्रमात त्यांच्याच नेत्यांनी त्यांना,”फुकटच्या पाटीलक्या करू नका”असा शालजोडा लगावून त्यांची जागा दाखवून दिली असल्याचा दावा केला आहे.त्यांना यापेक्षा काय पुरावा द्यायचा असा सवाल केला आहे.”तुम्ही सरकारमध्ये आहे,तुम्ही निधी आणा आणि उद्घाटने जरूर करा” असे आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान त्यांनी शहरातील अतिक्रमणे निघणार असल्याचा दावा करून,”आम्ही त्याला आम्ही आडवे येणार नाही.पण आगामी काळात सण उत्सव आले आहे.शहरातील गरजू आणि गरीबांचे धंदे पाणी होतील असे वागू नका,त्यांना मागे सरकून बसवा मात्र त्यांच्या पोटावर लाथ मारू नका” असे आवाहन गंगूले यांनी शेवटी केले आहे.
दरम्यान यावेळी नगरसेवक वाल्मीक अहिरे यांनी म्हटले आहे की,”दत्त मंदिर परिसरात प्रभाग क्रमांक १२ मधील वर्क ऑर्डर १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली त्यात आ.काळे यांनी मोरे घर तत्सम विविध कामांसाठी सुमारे ४०,३० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यांनी सत्ताधाऱ्यांनी उद्घाटने केली.मात्र प्रशासनाचे अधिकारी आणि विरोधी नगरसेवक यांना निमंत्रित केलें नव्हते याबाबत त्यांनी कोपरगाव नगरपालिकेला माहिती अधिकारात प्रश्न विचारला होता.त्यात,”पालिकेने उद्घाटन करताना कोणीही प्रशासकीय अधिकारी नव्हता असा नगरपरिषदेने लेखी खुलासा केला असल्याचा दावा केला आहे.व तो कार्यकम त्यांनी बेकायदा केला असल्याचा आरोप केला आहे.”तो निधी आ.आशुतोष काळे यांनी आणला” असल्याचा दावा केला आहे.१०० दिवसांचा कारभारात सत्ताधारी वर्ग आणि त्यांचे सहकारी नापास झाले आहे,८-९ महिन्यात एकही ठोस काम केलेले नाही.ही सर्व कामे आ.काळे यांनी केली” असल्याचा दावा केला आहे.
यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सत्ताधारी गट आरोप करत आहे की,”काळे गटाचे ०३ कोटींची बिले बाकी असल्याने ते अस्वस्थ झाले असल्याचा आरोप केला असल्याची माहिती दिली असता नगरसेवक मंदार पहाडे यांनी,” ते खोटेनाटे आरोप करत असून त्याचा त्यांनी पुरावा द्यावा” अशी मागणी केली आहे.सत्ताधारी मोकाट जनावरे पकडली असल्याचा दावा करत असले तरी ती माहिती खोटी असल्याचा दावा करून अद्याप शहरात जनावरे मोकाट फिरत आहे”,त्यांना ती पकडता येत नाही आणि सोडता येत नाही.शहरातील नागरिकांना बिलांचे काही देणे घेणे नाही” असे स्पष्टीकरण दिले आहे.पालिकेत अनेक ठेकेदार काम करत आहे.कोणी त्यांना दबाव आणलेला नाही.”मोकाट जनावरांमुळे कोपरगाव शहरात दोन नागरिकांचे बळी गेलेत त्याचे आधी उत्तरे द्या” असे आवाहन पहाडे यांनी शेवटी केले आहे.



