कोपरगाव शहर वृत्त
…या नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अखेर अपात्र?

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी आपल्या जातीचा प्रांताधिकाऱ्यांकडून चुकीचा दाखला दिल्याने त्या विरुद्ध अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचेकडे व जातपडताळणी कार्यालयाकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सागर निंबा आहेर यांनी तो दाखला अपात्र ठरविण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी अपील दाखल केले होते.ते अपील गृहीत धरून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी त्यांना अपात्र घोषित केल्याने त्यांचे नगरसेवकांसह उपनगराध्यक्ष पद संपुष्टात आले असल्याची माहिती आ.काळे गटाचे वकील ॲड.एम.यू.सय्यद यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान या जात प्रमाणपत्र अपात्रतेविरुद्ध ते मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात अपिलात गेले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.मात्र आपत्रतेबाबत त्यांनी सविस्तर मौन पाळल्याने त्यांना आता आपले उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची जागा सोडणे क्रमप्राप्त झाले असल्याचे समजले जात आहे.याशिवाय आगामी सहा वर्षासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित केले आहे.

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक दि.२० डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाली आहे.त्यात भाजप कोल्हे गटास १९ जागा तर काळे गटास ०११ जागा तर शिवसेना बंडखोर गटास ०४ जागा प्राप्त झाल्या होत्या.राष्ट्रवादी या विरोधी पक्षाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडचणीत आणण्याचा चंग बांधला असल्याचे दिसून येत आहे.त्यातील एक घटना आज उघड झाली आहे.त्यात प्रभाग क्रमांक ०९ मध्ये निवडणूक लढवलले भाजपचे नगरसेवक व पुढे या सत्रात पहिले उपनगराध्यक्ष पदाचे मानकरी ठरलेले जितेंद्र रणशूर यांचे विरुद्ध त्यांचे पराभूत विरोधक सागर आहेर यांनी आ.आशुतोष काळे यांच्या राजकीय पाठिंब्यावर दंड थोपटले होते.व त्यांच्या अनुसूचित जाती-३७ या प्रमाणपत्रास शिर्डी येथील जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे समोर आव्हान दिले होते.या शिवाय जात पडताळणीच्या अहिल्यानगर येथील कार्यालयात आव्हान दिले असल्याची माहिती सागर आहेर यांचे वकील एम.यू.(मुन्ना) सय्यद यांनी गत महिन्यात पत्रकार परिषदेत दिली होती.त्यामुळे आता दोन गटात सत्तास्पर्धेची रंगत वाढताना दिसत आहे.दरम्यान आज सागर आहेर यांचे वकील ॲड.सय्यद यांनी नगरसेवक तथा वर्तमान कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांना अपात्र घोषित करण्यासाठी अपील केले होते.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून त्याचा निकाल आज नुकताच जिल्हाधिकारी आशिया यांनी जाहीर केला आहे.त्याबाबत त्यांनी आज गौतम सहकारी बँकेत पत्रकार परिषदेत ही बातमी प्रसार माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.त्यामुळे सत्ताधारी कोल्हे गटाची एक विकेट एक वर्षाच्या आत पडली असल्याचे मानले जात असून याबाबत राष्ट्रवादी काळे गटाने जल्लोष व्यक्त केला आहे.

दरम्यान या जात प्रमाणपत्र अपात्रतेविरुद्ध ते मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात अपिलात गेले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.मात्र आपत्रतेबाबत त्यांनी सविस्तर मौन पाळल्याने त्यांना आता आपले उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची जागा सोडणे क्रमप्राप्त झाले असल्याचे समजले जात आहे.



