कोपरगाव शहर वृत्त
तरुण पिढी सुशिक्षित आणि सुसंस्कृत होण्याची गरज -मंत्री महाजन

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
देशातील तरुण पिढी देशाचे भविष्य आहे.तरुण पिढीने व्यसनाधिन होऊन चालणार नाही.छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या संस्कारावर आणि विचारांवर चाललात तर देश सुजलाम,सुफलाम होईल.तरुण पिढी सुशिक्षित आणि सुसंस्कृत झाली पाहिजे,असे मत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

“पुतळा अणावरणासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले.परंतु कार्यक्रम हाणून पाडले गेले.(कोणी आणि कितीवेळा हाणून पाडले याबाबत त्यांनी संबंधित शुभचिंतक नेते उपस्थित असल्याचे टाळले असावे) माझे प्रयत्न प्रामाणिक होते,हेतू शुद्ध होता,पण त्यावेळेस काय राजकारण झाले मला माहित नाही,मात्र आज अनावरण झाले याचा आनंद आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव..
कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे शुभहस्ते आले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते.
सदर प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे,शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,आ.आशुतोष काळे,आ.विवेक कोल्हे,कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,राजेंद्र बागुल,विनोद राक्षे,शरद त्रिभुवन,विनोद बागुल,सोमनाथ म्हस्के,सतीष शेलार,जयवंत मरसाळे,सुजन चंदनशिव,बाळासाहेब पवार यांच्यासह नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

आ.विवेक कोल्हे यांनी गोदावरी घाटासाठी तसेच पूर परिस्थितीत गोदावरी नदीचे पाणी शहरात शिरू नये म्हणून रिटेनिंग वॉलसाठी निधी मिळावा,पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्याच्या योजनेला चालणा मिळावी,अशी मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे केली.त्यावर गिरीष महाजन म्हणाले,”मी कुंभमेळा मंत्री आहे आणि त्याच बरोबर आपत्ती व्यवस्थापन खातेही माझ्याकडे आहे. तुमच्या गावात पाणी शिरणार नाही,यासाठी निश्चित निधी दिला जाईलअसे आश्वासन दिले आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”या पुतळ्यासाठी बरेच वर्षे संघर्ष झाला.मला अभिमान आहे की,पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माझ्या हातून होत आहे.अण्णाभाऊंनी आपल्या शब्दातून कष्टकरी माणसाचा आवाज बुलंद केला.शिक्षणाशिवाय माणूस मोठा होवू शकतो,हे अण्णाभाऊंनी दाखवून दिले.माणूस उंचीने नव्हे तर कष्टाने आणि विचाराने मोठा होतो,असेही महाजन शेवटी म्हणाले आहे.

“गेल्या चार-पाच वर्षा पासून “मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण करायचे म्हणून अनेकदा मर्केटलीला करून कार्यक्रम उधळून लावला.आज मुख्यमंत्री यांनी “अवघ्या ३० ते ४० कि.मी.अंतरावर गंगागिरीजी महाराज सप्ताहाला हजेरी लावली,मात्र कोपरगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या अनावरण करायला आले नाही हे दुर्दैव आहे”-ॲड.नितीन पोळ,सदस्य,कोपरगाव वकील संघ.
यावेळी सचिन साठे म्हणाले की,”अण्णाभाऊंच्या साहित्यातील प्रत्येक शब्द म्हणजे,लोकांचे दु:ख आहे.दीड दिवसाच्या शिक्षणावर अण्णाभाऊंनी मोठे साहित्य उभे केले.अण्णाभाऊंच्या दृष्टीतून आपल्याला माणूस म्हणून पुढे जायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आ.विवेक कोल्हे यांनी पुतळा उभारण्याचा इतिहास विशद केला.सन -१९७६ मध्ये माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी समाज बांधवांना एकत्र करून मेळावा घेतला.१९८०मध्ये अर्धाकृती पुतळ्याचे भूमीपूजन केले होते.९०-९१मध्ये भारतातील पहिला अण्णाभाऊंचा अर्धाकृती पुतळा कोपरगावात बसविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.महापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी त्यांचे विचार डोक्यात घेण्याची गरज असल्याचे कोल्हे शेवटी म्हणाले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.यावेळी प्रास्ताविक कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले तर शेवटी विनोद राक्षे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे..
सदर पुतळा अनावरण कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमात श्रावणसरींची हजेरी लावली असून परिणामी या कार्यक्रमाला नागरिकांनी तोळामासा गर्दी केली असल्याचे आढळून आले आहे.


