जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात…या पालिकेला निधी मंजूर !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

   कोपरगाव शहरातील स्वच्छता व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेच्या नवीन ६५ सीट्सच्या मुतारी उभारणीच्या आराखड्यास शासनाची मान्यता मिळाली असून,त्यासाठी एकूण ४० लाख ४९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

  

कोपरगाव शहर स्वच्छ,सुंदर आणि नागरिकांसाठी अधिक सुविधायुक्त करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा असून,आगामी काळातही शहरातील मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील,असे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले आहे.

   स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० हे महाराष्ट्रातील शहरांना कचरामुक्त,सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी सुरू केलेले एक महत्त्वाचे अभियान आहे.हे अभियान २०२१ ते २०२६ या कालावधीत राबवले जात आहे.शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर १००% शास्त्रोक्त प्रक्रिया करणे.सर्व नागरी भागात हागणदारी मुक्त स्थिती कायम ठेवणे.सांडपाण्याचे व्यवस्थापन करून वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणे.सर्व शहरांना कचरामुक्त बनवणेआदी कामे केली जात आहेत.त्यात ही कामे मंजूर झाली असल्याची माहिती हाती आली आहे.या मंजूर आराखड्यानुसार शहरात यापूर्वी १५० सीट्सचे शौचालय मंजूर आहेत.आता ६५ सीट्सची मुतारी सुविधा उपलब्ध होणार आहे.त्यामुळे नागरिकांना बाजारपेठ,गर्दीची ठिकाणे आणि सार्वजनिक वापराच्या परिसरात स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

नगराध्यक्ष पराग संधान.

  दरम्यान स्वच्छता ही केवळ शहराच्या सौंदर्याची बाब नसून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढविणे,नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा देणे आणि स्वच्छतेचा दर्जा उंचावणे याला नगरपरिषदेकडून प्राधान्य दिले जात आहे.संबंधित कामासाठी उपलब्ध निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर करण्याची दक्षता घेतली जाणार आहे.काम पूर्ण झाल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र व भौतिक-आर्थिक प्रगतीच्या आधारे पुढील निधी उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close