आंदोलन
ग्रीनफील्ड मार्गाच्या भूसंपादनाबत आपण शेतकऱ्यांसोबत-खा.वाकचौरे

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
सुरत चेन्नई या ग्रीनफिल्ड रस्त्याच्या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आपण शेतकऱ्यांबरोबर असून तो लढा शेतकऱ्यांनी सणादशील मार्गांनी लढावा लागेल आपण लवकरच केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांचेशी बोलून मार्गी लावणार असल्याचे आश्वासन शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे बोलताना केले आहे.

दरम्यान खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील प्रांत अरुण उंडे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना योग्य निर्देश दिले असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच या मार्गाचे काम मार्गी लावावे अशा सूचना दिल्या आहेत.त्याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या बैठकीनंतरच नोटिसा स्वीकारण्यात येतील असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला २०२६ मध्ये गती देण्यात आली असून,सोलापूर आणि नाशिकसह विविध जिल्ह्यांतून ही प्रक्रिया सुरू आहे.केंद्र सरकारच्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर,सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांतील भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली आहे.बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मोबदल्याची रक्कम जमा करण्याची कार्यवाही एनएचआय स्तरावर प्रलंबित प्रक्रियेतून मार्गी लावली जात आहे.काही भागांत, विशेषतः नाशिक जिल्ह्यातील सिन्नर,संगमनेर तालुक्यात,अपुरा मोबदला आणि चुकीच्या नोंदींमुळे शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध दर्शविला आहे.तसेच,काही ठिकाणी महसूल प्रशासनासोबत समन्वयाच्या अभावी प्रक्रिया अधांतरी राहिल्याचे समोर आले आहे.हा महामार्ग आता नाशिकजवळून सुरू होण्याची शक्यता असून,त्याबाबतचे फेरबदल विचाराधीन आहेत.प्रकल्पाचे स्वरूप: हा महामार्ग ६ पदरी असणार असून,त्याचा ताशी वेग १२० किमी नियोजित आहे.या पार्श्वभूमीवर आज संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक आज श्रीराम मंदिर सभागृहात आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे,तळेगावचे सरपंच प्रभाकर कांदळकर,वडझरीचे सरपंच संदीप गोरडे,अमृतवाहिनी बँकेचे संचालक किसनराव सुपेकर,डॉ.आर.पी.दिघे,प्रा.किसनराव दिघे,अशोक सातपुते,मच्छिंद्र दिघे,चिंचोली येथील कार्यकर्ते महेंद्र सोनवणे आदीसह तळेगाव दिघे,लोहारे,मीरपूर,वडझरी खुर्द,वडझरी बुद्रुक,चिंचोली आदी परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”२०१८ चे दर शासनाने लावू नये त्यासाठी आपण प्रयत्न करू,वेळ प्रसंगी आपल्याला न्यायालयीन पायरी चढावी लागू शकते.समृद्धी महामार्गाच्या वेळी कोपरगाव शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता त्याचा फायदा त्यांना झाला होता.बाधित शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि त्यांच्या नुकसानीचा विचार करायला हवा.मी या लढ्यासोबत नक्कीच राहणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.आपण देशातील सात राज्यांच्या भेटीवर आहे.तरीही आपण निवेदन तयार केले असून ते लगेच आपण पाठवून देऊ असे आश्वासन दिले आहे.आपल्याला लढा सनंदशील मार्गाने लढा लढवा असे शेवटी आवाहन केले आहे.
सदर प्रसंगी संदीप गोरडे यांनी प्रास्तविक करत आपल्या भावना व्यक्त करत शेतकऱ्यांच्या बागायती शेतीला प्रति एकर ०७-०८ लाखांचा दर देणे ही थट्टा असल्याने त्यास विरोध दर्शवला आहे.तर सूत्रसंचालन प्राचार्य किसन दिघे यांनी केले तर आभार माजी सभापती अविनाश सोनवणे यांनी केले आहे.
दरम्यान खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील प्रांत अरुण उंडे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना योग्य निर्देश दिले असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच या मार्गाचे काम मार्गी लावावे अशा सूचना दिल्या आहेत.त्याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.



