जाहिरात-9423439946
सण-उत्सव

शिर्डीत स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त…या संस्थेचे ध्‍वजारोहण संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत घरोघरी तिरंगा ह्या उपक्रमांतर्गत संस्‍थानचे अध्‍यक्ष आ.आशुतोष काळे यांच्‍या हस्‍ते आज सकाळी ०७.१५ वाजता श्री साईबाबा समाधी मंदिरावर राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण केले.तर १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त सकाळी ०८.१५ वाजता संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्‍ते शैक्षणिक संकुलाच्‍या क्रीडांगणावर राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करण्‍यात आले आहे.

सदर प्रसंगी शिर्डी शहरातील सर्व माध्‍यमिक शाळांमधील इयत्‍ता १० वीच्‍या परिक्षेत पहिल्‍या तीन क्रमांक पटकावलेल्‍या १९ गुणवंत विद्यार्थ्‍यांना श्री.द.म.सुकथनकर मार्च २०२२ हे पारितोषिक व संस्‍थानच्‍या शैक्षणिक संकुलातील इयत्‍ता १२ वीच्‍या कला,वाणिज्‍य व विज्ञान शाखेच्‍या परिक्षेत पहिल्‍या तीन क्रमांक पटकावलेल्‍या गुणवंत ०९ विद्यार्थ्‍यांना कै.लहानुबाई अमृतराव गोंदकर व कै.भागचंद कोंडाजी गोंदकर यांच्‍या स्मृती पित्‍यार्थ पारितोषिक वाटप करण्‍यात आले.

भारतीय स्‍वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर,स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत “घरोघरी तिरंगा” ह्या उपक्रमांतर्गत श्री साईबाबा संस्थानच्‍या वतीने संस्‍थानचे अध्‍यक्ष आ.काळे यांच्‍या हस्‍ते आज सकाळी ०७.१५ वाजता श्री साईबाबा समाधी मंदिरावर राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करण्‍यात आले.
सदर प्रसंगी साई संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत,विश्‍वस्‍त सर्वश्री अविनाश दंडवते,महेंद्र शेळके,सचिन कोते,उप-मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे,दिलीप उगले,कैलास खराडे,संजय जोरी, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी,सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.
तसेच १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्‍ते शैक्षणिक संकुलाच्‍या क्रीडांगणावर आज सकाळी ०८.१५ वाजता राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करण्‍यात आले.

यावेळी विश्‍वस्‍त सर्वश्री अविनाश दंडवते, डॉ.एकनाथ गोंदकर,सुनिल शेळके,सचिन कोते,उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव,प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे,दिलीप उगले,कैलास खराडे,संजय जोरी,संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी,सर्व विभागांचे विभाग प्रमुख,संस्‍थान कर्मचारी,शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

या प्रसंगी संस्‍थानच्‍या संरक्षण विभाग,फायर अॅण्‍ड सेफ्टी विभाग,सुरक्षा एजन्‍सीज, शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी आदींनी आकर्षक परेड सादर केले.त्‍यानंतर संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी बानायत व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते शिर्डी शहरातील सर्व माध्‍यमिक शाळांमधील इयत्‍ता १० वीच्‍या परिक्षेत पहिल्‍या तीन क्रमांक पटकावलेल्‍या १९ गुणवंत विद्यार्थ्‍यांना श्री.द.म.सुकथनकर मार्च २०२२ हे पारितोषिक व संस्‍थानच्‍या शैक्षणिक संकुलातील इयत्‍ता १२ वीच्‍या कला,वाणिज्‍य व विज्ञान शाखेच्‍या परिक्षेत पहिल्‍या तीन क्रमांक पटकावलेल्‍या गुणवंत ०९ विद्यार्थ्‍यांना कै.लहानुबाई अमृतराव गोंदकर व कै.भागचंद कोंडाजी गोंदकर यांच्‍या स्मृती पित्‍यार्थ पारितोषिक वाटप करण्‍यात आले.तसेच संस्‍थानच्‍या शैक्षणिक संकुलाच्‍या राज्‍यस्‍तरिय व जिल्‍हास्‍तरिय मराठी व इंग्रजी वकृत्‍व स्पर्धेत उल्‍लेखनिय यश संपादन केलेल्‍या विद्यार्थ्‍यानींचा ही श्रीमती बानायत यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

या प्रसंगी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी मनोगत व्‍यक्‍त करुन स्‍वातंत्र्य दिनाच्‍या सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या.त्‍यानंतर शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक सुधांशु लोकेगांवकर व विद्यार्थ्‍यांनी देशभक्‍तीपर गीत सादर केले.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कन्‍या विद्या मंदिरचे उपाध्‍यापक वसंत वाणी व अजिंक्‍यदेव गायकवाड यांनी केले.तसेच क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी आभार व्‍यक्‍त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close