विशेष दिन
वर्तमानात पत्रकारितेसमोर मोठी आव्हाने-पो.नि.जाधव

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या या व्यवस्थेत आजची पत्रकारिता ही जलद आणि गतिमान झाली आहे.त्यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत त्यांच्या जाणीव समाजाने ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे.महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे.यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते.त्यांच्या जन्मनिमित्ताने हा पत्रकार दिन साजरा करण्यात येतो कोपरगाव येथे डॉ.आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे हा दिन कोपरगाव शहरातील लोकस्वराज्य आंदोलन,कोपरगाव तालुका शेतकरी कृती समिती,मस्लिम विकास समिती,भमीपुत्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सदर प्रसंगी लोकस्वराज्य आंदोलने ऍड.नितीन पोळ,माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे,राजेश मंटाला,अकबर शेख,निसार शेख,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,पत्रकारांना कुठलेही मानधन नसताना तो आर्थिक तोशीस लावून व मोठी जोखीम पत्करून समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडत असतो.त्यांनी केलेल्या बातमीच्या वर्णनाने सदर घटना मनचक्षुसमोर उभे राहते.पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत.त्यांच्यासाठी समाजाने जाणीव ठेवणे गरजेचे आहे.पत्रकारांनी कायद्याची माहिती घ्यावी व पत्रकारितेचे आव्हान पेलावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी उपस्थितांना ऍड.नितीन पोळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,”कोपरगाव शहरातील पत्रकार आम्ही करत असलेल्या जनतेच्या हितार्थ कामांना प्रसिद्धी देतात व त्यातून प्रशासन दखल घेते त्यामुळे जनतेची कामे मार्गी लागतात असे सांगून पत्रकारांचे कौतुक केले आहे.
सदर प्रसंगी तुषार विध्वंस,आदिनाथ ढाकणे,अकबर शेख आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संतोष गंगवाल,यांनी केले तर सूत्रसंचालन तुषार विध्वंस यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुस्लिम विकास समितीचे अध्यक्ष आयुबभाई शेख यांनी मानले आहे.