सण-उत्सव
…या ठिकाणी श्री रामसिंगबाबांची जंगी यात्रा

न्यूजसेवा
संवत्सर –(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील ग्रामस्थांचे आराध्य असलेल्या श्री रामसिंगबाबा यांची जंगी यात्रा शुक्रवार दि.१७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व भाविकांनी श्री सत्यनारायण पुजा व महाप्रसादाचा लाभ घ्यावाअसे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान सदर प्रसंगी उद्या दु.४.३० वा.ह.भ.प.मंगलताई जेजुरकर जोगलटेंभी यांचे जाहिर हरि किर्तन संपन्न होणार आहे.तर कोपरगाव बेट येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
संवत्सर येथील श्री रामसिंगबाबा यांची जंगी यात्रा दर वर्षी ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या उत्साहात साजरी करत असतात.यावर्षीही तो उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.

सदर कार्यक्रम सकाळी ७. वाजता गंगास्नान सकाळी ८.वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी दु.४.०० वा. दु.४.३० वा.ह.भ.प.मंगलताई जेजुरकर जोगलटेंभी यांचे जाहिर हरि किर्तन संपन्न होणार आहे.तर कोपरगाव बेट येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे.सदर कार्यक्रम रामसिंगबाबा मंदिर रेल्वे नारंदी पुलाजवळ,संवत्सर येथे संपन्न होत आहे.याचा संवत्सर आणि परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



