सण-उत्सव
…या शहरात रमजान ईद उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी रमजान ईद निमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने ही शुभेच्छा दिल्या आहेत.या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक,मुस्लिम बांधव व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘रमजान ईद’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्व मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले.याप्रसंगी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या वतीने सर्व मुस्लीम बांधवाना ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुस्लिम धर्मियांमध्ये रमजान महिन्यात सुरू असलेले रोजे रमजान ईद दिनी सोडले जातात.रमजानचा महिना मुस्लिम बांधवांमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो.त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस येणारी ईद मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.मुस्मिम कॅलेंडरमध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून,चंद्रदर्शन झाल्यावर ईद-उल-फितर संपूर्ण जगभरात साजरी केली जात आहे.मुस्लिम कथांनुसार,जंग-ए-बद्र नंतर ईद-उल-फितर साजरी करण्याची प्रथा सुरू झाली.या युद्धात मुस्लिमांचा विजय झाला होता आणि याचे नेतृत्व प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर करत होते.त्यामुळे ईद साजरी करून या विजयाचा आनंद लूटण्यात आला होता.तसेच याच महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे,खडतर तपश्चर्येंचे फळ मिळाले.इस्लामिक धारणेनुसार,अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला.या पवित्र कुराण ग्रंथाचा पहिला संकेत मोहम्मद पैगंबरांना याच दिवशी मिळाला,असे सांगितले जाते.कोपरगाव शहर आणि तालुक्यात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठया उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी या कार्यक्रमात बोलताना कोल्हे म्हणाले की,”रमजान ईद हा एकात्मतेचा आणि सद्भावनेचा संदेश देणारा सण आहे.महिनाभर उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचा आणि समर्पणभावनेचा गौरव या निमित्ताने सर्वांनी साजरा केला.पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन प्रेम, बंधुत्व आणि सलोख्याचा संदेश देणे महत्त्वाचे आहे.
स्व.शंकरराव कोल्हे यांचे पासून गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून ईद निमित्त इफ्तारचे आयोजन केले जात असून या वर्षी देखील विविध ठिकाणी इफ्तार पार्टी आणि मज्जितमध्ये फळांचे बॉक्स कोल्हे कुटुंबाकडून पाठविले गेले.या उपक्रमामुळे सर्व समाजात सलोखा वाढतो,धार्मिक ऐक्य वृद्धिंगत होते आणि परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते.संजीवनी उद्योगाने नेहमीच तालुक्यात शांतता,बंधुत्व आणि विकास जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे.सण आणि उत्सव हे समाजाला एकत्र आणण्याचे माध्यम आहेत.त्यामुळे अशा प्रसंगी परस्पर सौहार्द वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.कोल्हे परिवाराच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि येणारे दिवस आनंदाचे,सुखाचे व भरभराटीचे जावोत अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,गटनेते प्रसाद आढाव,सर्व समिती सभापती,सर्व नगरसेवक,आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘रमजान ईद’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्व मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले.याप्रसंगी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या वतीने सर्व मुस्लीम बांधवाना ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक,विविध सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.



