जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

..या गावात नवरात्र उत्सव उत्साहात संपन्न

न्यूजसेवा

धामोरी -(प्रतिनिधी)


  कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील ए-वन प्रतिष्ठाणच्या वतीने नवरात्रोत्सव उत्सव कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

 या नवरात्रोत्सव कार्यक्रम प्रसंगी खिचडी महा प्रसादाचे वितरण करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजनात सुभाष भानुदास ताजणे आदींनी पुढाकार घेतला आहे.

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे.वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते.शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते.दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते.दुर्गा देवतेचे माहात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून,नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे,म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव उत्सव होय.हा उत्सव कोपरगाव तालुक्यातील धामोरीसह देशभर संपन्न होत आहे.

    या निमित्ताने मनोज पुंडलिक जगझाप, कल्पना मनोज,महेश भाणुदास ताजणे,अर्चणा महेश आदींनी आरती केली आहे.

   या नवरात्रोत्सव कार्यक्रम प्रसंगी खिचडी महा प्रसादाचे वितरण करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजनात सुभाष भानुदास ताजणे आदींनी पुढाकार घेतला आहे.

    या नवरात्रोत्वव सोहळा आयोजन प्रसंगी दररोज रात्री ८ ते १० या दरम्यान माहिला भाविकांमधून दांडिया सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

  या उत्सवास ए-वन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय ताजने,उपाध्यक्ष कैलास लकारे,खजिनदार राजेंद्र वाईकर,सचिव बाळासाहेब घुले,मनोज कुलकर्णी,विजय जेजुरकर,अमर माळी,कृष्णराव जगझाप,भाऊराव माळी, राकेश बोरकर,माणिक सोमासे,सुनील कदम, संकेत कडवे,रमेश आव्हाड,अमोल लकारे, नवनाथ कदम,लक्ष्मण सोमासे,मिननाथ मोरे, बाबासाहेब रौंदाळे,संजय मोरे,सचिन ताजने, नितीन भुसारे,दत्तात्रय खोलमकर,सुभाष जेजुरकर,आदित्य जेजुरकर,समीर भुसारे आदींनी सहयोग दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close