जाहिरात-9423439946
विशेष लेखमाला

कोपरगाव शहराला पाण्यापासून वेठीस ठेवण्याचा डाव-आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी देणें पाप आहे का ? मात्र मंजूर योजनांना उच्च न्यायालयातून खो द्यायचा आणि पाणी योजनांना अडथळा आणून भाजप ( कोल्हे गट) हे पाप कोठे फेडणार आहे ? असा रास्त सवाल नगर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी एका पत्रकार परिषदेत विचारला आहे.

सदर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप याचिका विरेंन बोरावके व सुनील गंगूले यांनी दाखल केली होती.त्यावर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यात हा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे.

कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवली होती. तसेच ५ नंबर साठवण तलाव मोठा असल्यामुळे या साठवण तलावासाठी वाढीव पाणी आरक्षित करण्यासाठी शासनाकडून ३.३२ द.ल.घ.मी.मंजुरी मिळविली होती.याच सोबत या ५ क्रंमांकाच्या साठवण तलावाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती.मात्र पडद्यामागून विरोध करणाऱ्या कोल्हे गटाने आपल्या धारणगाव,ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्याकरवी न्यायालयात पाच नंबर साठवण तलाव,प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण स्थगित करावे अशा आशयाची याचिका कोल्हे गटाचे ब्राम्हणगाव येथील समर्थक कैलास बाबुराव येवले,किसन राधाजी येवले,व धरणगाव येथील किसन राधाजी गाजरे आदींनी दाखल केली होती.त्याविरोधात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले व नगरसेवक विरेन बोरावके यांच्या नावे हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत सोमवार (दि.०२) रोजी सुनावणी होवून दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेतील मुद्दे ग्राह्य धरून ५ नंबर साठवण तलाव,प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण रद्द करावे ही विरोधकांची मागणी औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती या पार्श्वभूमीवर.कोपरगाव शहर राष्ट्रवादीच्या वतीने गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात आज बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी अड.विद्यासागर शिंदे,जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,गटनेते विरेंन बोरावके,मंदार पहाडे,माजी नगरसेवक कृष्णा आढाव,सेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे,फकीर कुरेशी,दिनकर खरे,डॉ.अनिरुद्ध काळे,तुषार पोटे,राहुल देवळाली कर,वाल्मिक आहेर,संदीप कपिले,प्रकाश दुशिंग,चंद्रशेखर म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी सुनील गंगूले यांनी कोपरगाव शहराला पाणी पुरवठ्यात जाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केला आहे.या तलावामुळे शहर वासीयांचा पाणी संघर्ष टळण्यास मदत होणार आहे.

सदर प्रसंगी प्रारंभी प्रास्तविक कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अड.विद्यासागर शिंदे यांनी न्यायालयीन बाजू मांडून त्याचे विश्लेषण केले आहे.

सदर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप याचिका विरेंन बोरावके व सुनील गंगूले यांनी दाखल केली होती.त्यावर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यात हा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close