जाहिरात-9423439946
विशेष लेखमाला

कोपरगावचे पाणी येवला तालुक्यातील गावांना कसे गेले-माजी नगराध्यक्षांचा सवाल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

दारणा धरणात पाणीच शिल्लक नाही अशी कोल्हेकुई करून त्यावेळी दारणा ऐवजी निळवंडे धरणातून जलवाहिणीतून पाणी आणावे लागत असल्याचा कांगावा करण्यात आला होता मात्र आज येवला तालुक्यात त्याच दारणा धरणातील कोपरगावच्या वाट्याचे पाणी कसे मंजूर झाले असा सवाल माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगावातील आजी-माजी आमदार असलेल्या काळे-कोल्हे या प्रस्थापित नेत्यांना विचारला आहे.

“दारणाचे पाणी लाभ क्षेत्राबाहेर जाण्याचे एकमेव कारण कोपरगाव तालुक्यातील नेत्यांत नसलेले एकमत.डोळ्यावर ओढून घेतलेले कातडे,बंदिस्त निळवंडे पाणी योजनेची चर्चा सुरू झाली त्यावेळेस दारणा मध्ये पुरेसे पाणी नसल्याचा कांगावा त्यावेळी याच नेत्यांनी केला होता.पण आता मात्र त्याच दारणा मधून म्हणजेच कोपरगाव,राहाता,निफाड,श्रीरामपूर तालुक्यातील शेती सिंचनाचे पाणी थेट लाभक्षेत्राच्या बाहेर असलेल्या येवला तालुक्यातील राजापूरसह चाळीस गावांसाठी पाणी कसे आरक्षित केले गेले”-विजय वाहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव,राहाता,निफाड आदी दुष्काळी तालुक्यातील भूकबळी थांबविण्यासाठी व या तालुक्यांना पाणी पुरविण्यासाठी इंग्रज राजवटीत शेती सिंचनासाठी दारणा धरण बांधण्यात आले होते.मात्र गत शंभर वर्षात या धरणातील मुख्य शेती सिंचनाचे पाणी सोडून उद्योग,महानगरपालिका,सग्यासोयऱ्यांच्या लिफ्ट योजना,महाकाय उद्योग आदींना वाटून देण्याचा सपाटा सुरु आहे.नुकताच दारणा धरणाच्या लाभक्षेत्राबाहेरील येवला तालुक्यातील राजापूरसह चाळीस गावांना राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने दारणा धरणातून दि.०७ मार्च २०२२ रोजी (शासन निर्णय क्रं.बी.सिं.आ.२०२२/३५/२०२२/सिं.व्य.(धो.-२) २.६८ द.ल.घ.मी.नांदूर मधमेश्वर उंचावनी बंधाऱ्यातून पाणी मंजूर केले आहे.व त्यासाठी प्रस्थापित नेत्यांनी कोणताही विरोध दाखविला नाही हे विशेष ! त्यावरून नुकताच शिवसेनेचे तारोडी मतदार संघाचे संपर्क नेते प्रवीण शिंदे यांनी सवाल विचारून जनतेला जागे केले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रस्थापित नेत्यांना हा तिखट सवाल केला आहे.

त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”वर्तमानात कोपरगाव शहर व तालुक्यातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.प्रत्येक प्रश्नाकडे,विषयाकडे विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून न बघता लाभार्थ्यांचे हितास प्राधान्य देणे गरजेचे आहे.मात्र याच्या उलट अनुभव येत आहे.त्यासाठी त्यांनी प्रस्थापित नेत्यांना दूषणे देताना म्हटलं आहे की,”दारणाचे पाणी लाभ क्षेत्राबाहेर जाण्याचे एकमेव कारण कोपरगाव तालुक्यातील नेत्यांत नसलेले एकमत.डोळ्यावर ओढून घेतलेले कातडे,बंदिस्त निळवंडे पाणी योजनेची चर्चा सुरू झाली त्यावेळेस दारणा मध्ये पुरेसे पाणी नसल्याचा कांगावा त्यावेळी याच नेत्यांनी केला होता.पण आता मात्र त्याच दारणा मधून म्हणजेच कोपरगाव,राहाता,निफाड,श्रीरामपूर तालुक्यातील शेती सिंचनाचे पाणी थेट लाभक्षेत्राच्या बाहेर असलेल्या येवला तालुक्यातील राजापूरसह चाळीस गावांसाठी पाणी कसे आरक्षित केले गेले ? हे न उलगडणारे कोडेच आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांची एकच अपेक्षा आहे आम्हाला पाणी द्या-पाणी कुठूनही आणा-श्रेय कुणीही घ्या पण पाणी द्या.निदान पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राजकिय एकजूट महत्वाची आहे.पण आपल्याकडे विपरीत परिस्थिती आहे.आजी माजी आमदारांनी विधानसभा निवडणुकीत संघर्ष अवश्य करावा,पण जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या पाण्याबाबत तरी राजकारण करू,अडथळे आणू नयेत.येथून पुढे तरी निवडणूका पाहून गाजराच्या पुंग्या वाजविणे बंद झाले पाहिजे असे आवाहन माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close