जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अपघातात एक ठार,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव पाटी येथील रहिवासी भारत दत्तात्रय निंबाळकर (वय-६५) हे एका अपघातात जखमी झाले होते.त्यांना उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा संस्थान रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथे उपचार सुरु असताना त्यांचे निधन झालं आहे.या प्रकरणी शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयाने शिर्डी येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची खबर दिली होती त्यांनी या प्रकरणी नोंद करून हा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

मयत भारत निंबाळकर हे कोळगाव पाटी येथील रहिवासी असून त्यांचा दि.१८ एप्रिल २०२२ रोजी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती.या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.त्यांना नजीकच्या नागरिकांनी उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा रुग्णालायत भरती केले होते.तेथे उपचार सुरु असताना त्यात त्यांचें निधन झाले होते.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत हे कोळगाव पाटी येथील रहिवासी असून त्यांचा दि.१८ एप्रिल २०२२ रोजी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती.या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.त्यांना नजीकच्या नागरिकांनी उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा रुग्णालायत भरती केले होते.तेथे उपचार सुरु असताना त्यात त्यांचें निधन झाले होते.या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी कोपरगाव तालुका पोलिसांना या प्रकरणी हा गुन्हा वर्ग केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी याबाबत हा गुन्हा आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.३३/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.व्ही.एन.कोकाटे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close