लोकसभा कामकाज
…या तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी केंद्राकडे प्रस्ताव नाही-केंद्राची माहिती.

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्यातील तीर्थक्षेत्रांचा पर्यटन विकास व देखभालीची मुख्य जबाबदारी संबंधित राज्य सरकाराची असली तरी केन्द्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारांना पर्यटन विकासासाठी सहकार्य करत असून महाराष्ट्र सरकारकडून नेवासा तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी केन्द्र सरकारकडे अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही मात्र महाराष्ट्र राज्यातील विविध पर्यटन विकास प्रकल्पासाठी केन्द्र सरकारने सुमारे रु. ४३७.१० कोटीची मंजूरी दिली असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांनी खा.वाकचौरे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

दरम्यान खा.भाउसाहेब वाकचौरे यांनी संसदेत नेवासा तीर्थक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करुन याबाबत सरकारचे लक्ष वेधल्यामुळे नेवासा येथील ऐतिहासिक,सांस्कृतिके व धार्मिक महत्वाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे तसेच भविष्यात नेवासा तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी केन्द्र व राज्य सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे.पहिल्या टप्प्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाखवलेल्या माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या ‘फ़ॉर स्टार्स ऑफ़ डेस्टिनी’ यांचे पुस्तक दाखवल्याने वाद निर्माण झाला होता.आता इराण-इस्रायल युद्धाचा भडका उडाला असताना भारताचे संसदीय अधिवेशन सुरु आहे.यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशनामध्ये या युद्धाची ठिणगी पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.देशातील तेल साठे,गॅस साठे यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरले जात आहे.संसदेच्या दुसऱ्या टप्प्यात सभागृहात मत मतांतरे होत आहे.या टप्प्यात,अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर लोकसभेत चर्चा होत आहे.तर दुसरीकडे शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपला शिर्डी मतदार संघ हा धर्माचा बनविण्याचे काम सुरू ठेवले आहे.या अधिवेशनात त्यांनी या मतदार संघातील विविध धर्मस्थळे ही रामायण काळातील नाशिक,अकोले येथील अगस्ती ऋषी आश्रम,मोहिनीराज मंदिर,शुक्राचार्य मंदिर,धांदरफळ येथील धौम्य ऋषी आश्रम,नेवासा परिसरातील लाडमोड टेकडी जेथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमदभगवतगीतेवर प्रसिध्द प्रवचन दिले होते,डाऊच खुर्द जेथे प्रभू रामचंद्र यांनी आपल्या पिताश्री राजा दशरथ यांचे पिंडदान केले अशी ठिकाणी असल्याने त्यांचा विकास होणं गरजेचे असल्याचे खा.वाकचौरे यांनी लोकसभेत केले आहे.

दरम्यान त्यावेळी केंद्रीय मंत्री शेखावत यांनी त्याला उत्तर देताना म्हटले आहे की,”अहिल्यानगर येथील नेवासा परिसरातील लाडमोड टेकडी जेथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमदभगवतगीतेवर प्रसिध्द प्रवचन दिले होते.या स्थळाला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून पुरातत्व स्थळ व अवशेष अधिनियम १९५८ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे.राज्यातील तीर्थक्षेत्रांचा पर्यटन विकास व देखभालीची मुख्य जबाबदारी संबंधित राज्य सरकाराची असली तरी केन्द्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारांना पर्यटन विकासासाठी सहकार्य करत असल्याचे ही मंत्री शेखावत यांनी स्पष्ट केले आहे.महाराष्ट्र सरकार कडून नेवासा तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी केन्द्र सरकारकडे अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही मात्र महाराष्ट्र राज्यातील विविध पर्यटन विकास प्रकल्पासाठी केन्द्र सरकारने सुमारे रु. ४३७.१० कोटीची मंजूरी दिली आहे.

दरम्यान खा.भाउसाहेब वाकचौरे यांनी संसदेत नेवासा तीर्थक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करुन याबाबत सरकारचे लक्ष वेधल्यामुळे नेवासा येथील ऐतिहासिक,सांस्कृतिके व धार्मिक महत्वाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे तसेच भविष्यात नेवासा तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी केन्द्र व राज्य सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जातील अशी अपेक्षा खा.वाकचौरे यांनी शेवटी व्यक्त केली आहे.



