जाहिरात-9423439946
निवडणूक

गणेश कारखान्याना निवडणूक,अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी…इतके अर्ज !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा निवडणूकीस आता रंग भरू लागला असून नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवशी दि.१९ मे त्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्यासह श्री गणेश सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष अड्.नारायण कार्ले,साई संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर आदींनी ठाण मांडल्याचे दिसून आले असून १९ जागांसाठी १०६ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी माणिक आहेर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहेत.

दरम्यान अशोक सहकारी कारखाना व श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर शेतकरी संघटना राहाता तालुक्यात सक्रिय झाली असून त्याचा प्रस्थापित नेत्यांनी चांगलाच धसका घेतला असल्याचे दिसून आले आहे.अन्यथा या कारखान्याची निवडणूक प्रस्थापित नेते बंद कपाटात घेणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती.मात्र रणांगणात शेतकरी संघटना उतरल्याने प्रस्थापित नेते आणि त्यांच्या थप्पीला लावलेल्या कार्यकर्त्यांचा भाव चांगलाच वधारला असल्याची माहिती असून त्यांनी शेतकरी संघटनेला दुवा दिला आहे.या निवडणुकीत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कोल्हे गट शेतकरी संघटनेला बरोबर घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.व शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र शेतकरी संघटना नेमकी काय भूमिका घेणार याकडे प्रस्थापित नेते आणि सभासद आणि राजकीय धुरिणांचे लक्ष लागून आहे.

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपले नामनिर्देशन पत्र दाखल करताना शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.

राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच सहकार विभागाने जाहीर केला असून नामनिर्देशन पत्र भरण्यात दि.१५ मे पासून सुरुवात झाली असून ते भरण्याचा अखेरचा दिवस दि.१९ मे होता.यात आलेल्या अर्जाची छाननी दि.२२ मे रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दि.२३ मे ते ०६ जून २०२३ पर्यंत दुपारी ०३ वाजे पर्यंत आहेत तर निवडणूक दि.१७ जून रोजी सकाळी ०८ ते दुपारी ०५ वाजे पर्यँत संपन्न होणार.काल शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता.गुरुवार दि.१८ मे रोजी शेतकरी संघटनेच्या गुरुवारी १४ जणांनी तर काल अखेरच्या दिवशी महसूल मंत्री विखे,माजी मंत्री थोरात,तर माजी आ. कोल्हे गटासह विविध उमेदवारांनी ९२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून शेवटच्या दिवशी एकूण १०६ जणांनी कारखाना निवडणूकीच्या मैदानात विविध मतदार संघातुन हे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.विखे गटाने ३८ तर इतर विरोधकांनी ६८ अर्ज दाखल केले आहेत.ते अर्ज पुढील प्रमाणे-

सर्वसाधारण उत्पादक गट
शिर्डी गट क्रमांक-१

बाबासाहेब दादा डांगे,बाजीराव कोंडाजी थेटे,भाऊसाहेब पंढरीनाथ थेटे,विजय भानुदास दंडवते,अशोक दामोधर दंडवते,अनुप अशोकराव दंडवते,बाबासाहेब रामभाऊ डांगे,दिगंबर शिवराम कोते,विलास यादवराव कोते,विनायक यशवंत कोते,बाबासाहेब परसराम मते असे शिर्डी गटातुन दोन जागांसाठी ११ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

राहाता गट क्रमांक -२

शिवाजी तुकाराम अनाप,नारायण ज्ञानेश्‍वर कार्ले,(माजी अध्यक्ष कोल्हे गट) उत्तम बळवंत डांगे,ज्ञानेश्‍वर बाबुराव सदाफळ,अनिल सोपान सदाफळ,संपत कचरु हिंगे,पुंजाजी दगडू गमे (२ अर्ज),गंगाधर पांडूरंग डांगे असे राहाता गटातील ३ जागेसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

अस्तगाव गट क्रमांक -३

हौशिराम विश्‍वनाथ चोळके (२ अर्ज), बाबासाहेब नामदेव निर्मळ (देवराम),महेंद्र चांगदेव गोर्डे,सतीष पंढरीनाथ मोरे, नानासाहेब काशिनाथ नळे,विष्णु जगन्नाथ घोरपडे,शिवनाथ नेवजी घोरपडे,संजय कारभारी नळे,जालिंदर गंगाधर मुरादे,विजय रामभाऊ जेजुरकर,ज्ञानदेव बाजीराव चोळके,संजय गणपत चोळके,बाळासाहेब कुंडलिक चोळके, सुर्यभान दशरथ गोर्डे असे अस्तगाव गटात ३ जागांसाठी १५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

वाकडी गट क्रमांक-४

अरुंधती अरविंद फोपसे,बाळासाहेब भाऊसाहेब लहारे,रामकृष्ण खंडू बोरकर,विठ्ठल कचरु शेळके,भास्कर नानासाहेब घोरपडे,सुधीर वसंतराव लहारे,गजबा रंगनाथ फोपसे,विशाल पुरुषोत्तम गोरे,राजेंद्र विठ्ठल लहारे,नारायण भिकाजी शेळके,संपत काशिनाथ शेळके,विष्णुपंत शंकर शेळके असे वाकडी गटातुन ३ जागेसाठी १२ उमेद्वारी अर्ज दाखल झाले आहेत.

पुणतांबा गट क्रमांक-५

नानासाहेब खुशाल गाढवे,बापु पंढरीनाथ धनवटे,मंदा दादासाहेब गाढवे,आण्णासाहेब जनार्दन सातव,दिलीप दादा क्षिरसागर,चंद्रकांत यादव डोखे,प्रकाश भिमाशंकर वहाडणे,उमाकांत भास्कर धनवटे,साहेबराव तुकाराम बनकर, जनार्दन भागुजी गाढवे,अनिल सोपान गाढवे,दिपक रामकृष्ण डोखे,संपत नाथाजी चौधरी,यशवंत आण्णासाहेब चौधरी,दत्तात्रय सदाशिव धनवटे,बाळासाहेब दत्तात्रय गाढवे आदींचा समावेश असून पुणतांबा गटातील २ जागांसाठी १६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

ओबीसी मतदार संघ-

नारायण गोविंद भुजबळ,अण्णासाहेब बजाबा वाघे,शिवाजी तुकाराम अनाप,बलराज पुंडलिक धनवटे,नानासाहेब रेवजी शेळके,अनिल राजाराम टिळेकर,सुनिता तुकाराम बोरबणे,प्रकाश रामदास पुंड,सुरेश सुकदेव गाडेकर,विजय रामभाऊ जेजुरकर आदींचा समावेश असून इतर मागासवर्ग मतदार संघाच्या १जागेसाठी १० जणांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत.

उत्पादक सहकारी संस्था,बिगर उत्पादक संस्था,पणन संस्था प्रतिनिधी मतदार संघ-

सुधाकर नारायण जाधव,राजेंद्र विठ्ठलराव लहारे,यशवंत आण्णासाहेब चौधरी,ज्ञानदेव बाजीराव चोळके.या ‘ब’ गट मतदार संघातुन १ जागेसाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ-

अलेश शांतवन कापसे,बाबासाहेब गणपत पाळंदे,दत्तात्रय मारुती पोटे,गणेश बाबुराव थोरात,प्रदिप पोपटराव बनसोडे आदींनी या मतदार संघातील १ जागेसाठी ०५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

महिला प्रतिनिधी मतदार संघ-

अरुंधती अरविंद फोपसे,वैशाली दिलीप क्षिरसागर,लताताई लक्ष्मण डांगे,लक्ष्मीबाई नानासाहेब गाढवे,शोभाताई एकनाथ गोंदकर,कांचनमाला तुकाराम गाढवे,कमलबाई पुंडलिक धनवटे,सुजाता बाळासाहेब शेळके,सुनिता तुकाराम बोरबणे,मंदा दादासाहेब गाढवे,सुलभा मधुकर कोते,अनिताबाई विलास कोते,लताबाई बाबासाहेब डांगे, गयाबाई ओंकार भवर,सुनिता रामेश्‍वर फोपसे,मंदाकिनी विठ्ठल डांगे आदींनी या मतदार संघातील दोन जागांसाठी १६ जणी महिला इच्छुक असल्याचे दिसून आले आहे.

भटक्या विमुक्त जाती व जमाती,विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी-

भगवंता मायंजी मासाळ,आणासाहेब जनार्दन सातव,भिमराज चांगदेव रक्टे,मधुकर यशवंतराव सातव,सुनिल मुरलीधर थोरात,संजय आबाजी भाकरे,साहेबराव भाउराव काटकर,वसंत सखाराम गायकवाड आदींनी या मतदार संघातुन १जागेसाठी ८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.दरम्यान शेतकरी संघटनेने या निवडणुकीत उडी घेतल्याने सत्ताधारी आणि सहकारातील उत्तरेतील व पश्चिमेतील नेते सक्रिय झाले असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे शेवटच्या दिवशी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,जिल्हा संघटक शिवाजी जवरे,कामगार नेते रमेश देशमुख यांचे सह शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांची मोठी फौज दिसून आली असून विविध नेत्यांच्या स्वीय सहायकांची मोठी मांदियाळी दिसून आली आहे.

दरम्यान या दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीस २२ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. तर २३ मे ते ६ जून पर्यंत उमेदवारी अर्ज सकाळी ११ ते ३ यावेळेत मागे घेता येईल.६ जून ला या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन प्रांताधिकारी माणिक आहेर काम पहात असून त्यांना राहाता तहसिलदार अमोल मोरे हे व त्यांचे सहकारी सहकार्य करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close