जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

वीस हजारांची लाच घेताना महसुलचा वरीष्ठ अधिकारी जेरबंद,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तहसील कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी एका विनयभंगाच्या खटल्यात अडकला असताना आज पुन्हा एकदा त्यास वाळू वाल्याकडून सुमारे २० हजार रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेताना रंगेहात पकडले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान आज दि.१९ मे सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास आज एका अवैध वाळू उपशाची लाच घेताना सदर वरिष्ठ अधिकाऱ्यास रंगेहात पकडले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.सदर लाच हि तहसीलच्या आवारात असललेल्या एका कॉर्नरवर हॉटेल मध्ये घेत असताना हि घटना घडली आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत अनेक प्रत्यक्ष दर्शीनी यास दुजोरा दिला आहे.

राज्यातील बहुतेक जिल्ह्यात वाळू विक्री केंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असल्याचा दावा महसूल विभागाच्या मंत्र्यांकडून व अधिकाऱ्यांकडून सुरु आहे.सामान्य नागरिकांना घरकुलासाठी वाळूची उपलब्धता होत असल्याचा दावा महसूल विभागाकडून होत असला तरी बांधकाम व्यावसायिक आणि खाजगी बांधकाम करणाऱ्या नागरिकांच्या हाती भोपळा असल्याची प्रतिक्रिया राज्यात उमटली आहे.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहर आणि तालुक्यात अद्याप वाळू मिळत नाही मात्र अधिकाऱ्यांच्या आर्थिक आशीर्वादाने मात्र गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उचलली जात आहे.त्यातून अधिकारी आपले कोट कल्याण करत आहे.त्यातून मोठ्या प्रमाणावर वाळूचोर शेफारले असून त्यास राजकीय अभय मिळत आहे असे नव्हे तर तेही त्यात सामील होत असल्याचे दिसत आहे.त्यातून अधिकाऱ्यांचा जास्तीचा हव्यास कामी येत आहे.अशीच घटना आज सायंकाळी कोपरगावात घडली असून लाच घेताना अधिकारी पकडला गेला आहे.

या पूर्वीही कोपरगाव तहसीलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे ०५.१५ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करून तेथील दरवाजा ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी दि.२५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोग्य विभागाच्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.कोपरगाव शहरासह तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती.त्यात आता नवनवीन खुलासे झाले होते.त्यात समृद्धी महामार्गाच्या ठेकेदारांच्या अवैधरित्या गाड्या वापरणे सह अनेक प्रताप उघड झाले होते.सदर अधिकाऱ्यास वरिष्ठ अधिकाऱ्यानी बऱ्याच वेळा समज देऊनही त्यात सुधारणा झाली नाही असे म्हटले जात आहे.

दरम्यान आज दि.१९ मे सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास आज एका अवैध वाळू उपशाची लाच घेताना सदर वरिष्ठ अधिकाऱ्यास रंगेहात पकडले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.सदर लाच हि तहसीलच्या आवारात असललेल्या एका कॉर्नरवर हॉटेल मध्ये घेत असताना हि घटना घडली आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत अनेक प्रत्यक्ष दर्शीनी यास दुजोरा दिला आहे.दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप आमचे पर्यंत हि घटना आलेली नाही.तर अनेकांनी मात्र या घटनेस दुजोरा दिला आहे.तर लाचलुचपतचे अधिकारी नितीन कराड यांचेशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close