गुन्हे विषयक
‘त्या’ अधिकाऱ्यासह दोन जण गजाआड,दोन दिवसांची पोलीस कोठडी,कोपरगावातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावचे तहसील तहसीलदार विजय जबाजी बोरुडे व त्यांना लाच घेण्यात मदत करणारा आरोपी गुरमितसिंग दडियाल या दोन आरोपीना वाळूचोरीतील वाहनावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना काल रात्री अटक करण्यात आली होती त्यांना आज कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आज दुपारी ३.३० वाजता हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती नाशिक येथील तपासी अधिकारी तथा लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान लाचलुचपत विभागाची हि कारवाई आज पहाटे ५.३० च्या सुमारास पूर्ण झाली असून दोन्ही आरोपीस लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही आरोपीना अटक करून आज दुपारी ३.३० वाजता कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्या.भुजंगराव पाटील यांचे समोर हजर केले असता तहसीलदार विजय बोरुडे व त्याचा सहकारी गुरमितसिंग दडियाल यास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची म्हणजेच दि.२२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज्यातील बहुतेक जिल्ह्यात वाळू विक्री केंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असल्याचा दावा महसूल विभागाच्या मंत्र्यांकडून व अधिकाऱ्यांकडून सुरु आहे.सामान्य नागरिकांना घरकुलासाठी वाळूची उपलब्धता होत असल्याचा दावा महसूल विभागाकडून होत असला तरी बांधकाम व्यावसायिक आणि खाजगी बांधकाम करणारे नागरिकां यांच्या हाती काहीच लागत नसल्याची प्रतिक्रिया उत्तर नगरसह राज्यात उमटत आहे.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहर आणि तालुक्यात अद्याप वाळू मिळत नाही मात्र अधिकाऱ्यांच्या आर्थिक आशीर्वादाने मात्र पर्यावरणाची ऐसीतैसी करत गोदावरी नदीतून वाळू माफियाकडून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उचलली जात आहे.यावर कुठलीही संघटना आवाज उठवताना दिसत नाही हे विशेष ! त्यातून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे फावत असून त्यातून अधिकारी हप्ते घेऊन आपली तुंबडी भरत आहे.त्यातून मोठ्या प्रमाणावर वाळूचोर शेफारले असून त्यांना राजकीय अभय मिळत असल्याने ते आता अधिकाऱ्यांना मोजत नसल्याचे उघड होत आहे.अधिकारी जास्तीचा आर्थिक हव्यास पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जात असल्याचे दिसून येत आहे.त्यातच वाळूचोरही त्यांच्या पुढची आवृत्ती झाले असून ते त्यांना जाळ्यात अडकविण्याची कसर सोडताना दिसत नाही.यातील महसूल विभागातील हि सातवी कारवाई झाली असल्याची विश्वसनींय माहिती हाती आली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी (वय-३३) यांनी आपले वाळूचोरीत पकडलेल्या वाहनावर कारवाई न होण्यासाठी तहसीलदार विजय बोरुडे याने आपल्या गुरमितसिंग दडीयाल या हस्तकांमार्फत २० हजार रुपयांची लाच मागितली होती. (सदर हस्तक हा जुन्या शिवसेनेच्या एका माजी शहर पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याची माहिती आहे) त्यावर नाराज होऊन फिर्यादीने हा सापळा लावला होता.त्यातून कोपरगावचा तहसीलदार विजय बोरुडे (वय-४४) हा आपल्या हस्तकांमार्फत सुमारे २० हजारांचा हप्ता पंचासमक्ष घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप्पधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या पथकाकडून पडकले गेले आहे.त्यांना सहकार्य करणारा इसम गुरमीतसिंग दडियाल (वय ४०) रा.कोपरगाव यास हि काल सायंकाळी तहसील कार्यालयाच्या कोपऱ्यावर असलेल्या हॉटेल मध्ये काल सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले आहे.
त्यावेळी प्रवीण लोखंडे यांना पोलीस हवालदार पंकज पळशीकर,पो.नाईक नितीन कराड,प्रवीण महाजन,प्रभाकर गवळी,चालक पो.ना.संतोष गांगुर्डे आदींनी सहकार्य केले होते.
आज पहाटे ५.३० च्या सुमारास हि कारवाई पूर्ण झाली असून दोन्ही आरोपीस लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही आरोपीना अटक करून आज दुपारी ३.३० वाजता कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्या.भुजंगराव पाटील यांचे समोर हजर केले असता तहसीलदार विजय बोरुडे व त्याचा सहकारी गुरमितसिंग दडियाल यास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची म्हणजेच दि.२२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याकामी जिल्हा न्यायालयातील सरकारी अभियोक्ता अड्.बाबासाहेब पानगव्हाणे यांनी काम पाहिले आहे तर आरोपीं तहसीलदार यांच्या वतीने अड्.जयंत जोशी तर दुसरा आरोपी गुरमितसिंग दडियाल याचे वतीने अड्.व्ही.पी.ख्रिस्ते यांनी काम पाहिले आहे.