जाहिरात-9423439946
निवडणूक

पढेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी…यांची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रगण्य असलेल्या पढेगाव विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी भाजपचे उत्तमराव चरमळ तर उपाध्यक्षपदी सखुबाई शिंदे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यात पुर्व भागातील पढेगाव येथील विकास सेवा सोसायटीवर परजणे गटाचे बरीच वर्ष निर्विवादपणे वर्चस्व होते.परंतु यावेळी हे वर्चस्व संपुष्टात आल्याचे बघायला मिळाले.मागील महिन्यात एकुण तेरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत तुल्यबळ कमी असुनही काळे गटाने कडवी झुंज देत भाजप आणि परजणे युतीच्या उमेदवारांना पळता भुई थोडी करत काळे गटाची एक महिला उमेदवार निवडून आली होती.

कोपरगाव तालुक्यात पुर्व भागातील पढेगाव येथील विकास सेवा सोसायटीवर परजणे गटाचे बरीच वर्ष निर्विवादपणे वर्चस्व होते.परंतु यावेळी हे वर्चस्व संपुष्टात आल्याचे बघायला मिळाले.मागील महिन्यात एकुण तेरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत तुल्यबळ कमी असुनही काळे गटाने कडवी झुंज देत भाजप आणि परजणे युतीच्या उमेदवारांना पळता भुई थोडी करत काळे गटाची एक महिला उमेदवार निवडून आली होती.आणि इतर भाजप परजणे युतीच्या अकरा उमेदवारांपैकी काही जणांचा बोटावर मोजण्या इतपत मताच्या फरकाने विजय झाला.तर भाजपचे सुहास भारती बिनविरोध निवडून आले होते.

अनेक वर्षांपासुन परजणे गटाचे गोदावरी दुध संघाचे माजी संचालक गोरक्षनाथ शिंदे यांचेकडे एकहाती सोसायटीची सुत्रे होती.मात्र सभासदांवरील पकड ढिली झाल्यामुळे त्यांनी भाजप गटाला जास्त उमेदवार देऊन एकोपा घडुन आणला आता त्याचा परिणाम दिसून आला आहे.

सोसायटीच्या विजयी उमेदवारांत उत्तम रायभान चरमळ,किरण वाल्मिक शिंदे,परसराम भगिरथ कदम,गोरक्षनाथ प्रभाकर मापारी,अरविंद वसंत लंके,अशोक परसराम शिंदे,भारत सुर्यभान पठाडे,संजय नानासाहेब शिंदे,दत्तु भागवत वाघ,सुहास विठ्ठल भारती,दिलीप केरु पगारे,सखुबाई भास्कर शिंदे अशे बारा उमेदवारांत बहुसंख्येने भाजप व अल्पसंख्येत परजणे गटाचे उमेदवार आहे.तर निर्मला अण्णासाहेब शिंदे या एकमेव राष्ट्रवादी गटाचे प्रतिनिधित्व करत आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले.त्यांना सोसायटीचे सचिव बाळासाहेब शिंदे,सागर गोल्हार यांनी सहाय्य केले.या वेळी नवनिर्वाचित संचालक व गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close