जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरात पुतळ्याच्या उदघाटनावरून पेटले राजकारण !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील पंचायत समिती,कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासह विविध इमारतींच्या उदघाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह राज्यातील मंत्रीगण येत्या ०६ एप्रिल रोजी येत असताना आज सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास अचानक मातंग समाजाच्या एका कार्यकर्त्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सपत्नीक उदघाटन करून एकच खळबळ उडून दिली आहे.त्यामुळे मातंग समाजात दोन तट पडले असून या बाबत कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे प्रक्रिया सुरु असल्याचे दिसून आले आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्ये पुतळ्याचे आगमन झाले तेंव्हा आ.आशुतोष काळे व तत्कालीन नगराध्यक्ष वैजय वाहडणे यांनी त्याचे स्वागत केले तो क्षण.

कोपरगाव शहरात पंचायत समिती,कोपरगाव शहर पोलीस ठाणे,राज्य परिवहन मंडळाचे कोपरगाव बस आगाराचे उदघाटनासाठी येत आहे.त्याच वेळी आपण त्यांचे हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे उदघाटन करून घेऊ असा विचार प्रवाह सुरु झाला असता त्यासाठी आज सकाळी मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची शहरात बैठक संपन्न झाली होती त्यात हा वाद उफाळून आला असून एकाने त्यात परस्पर उदघाटन करून आफत ओढवून घेतली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात येत्या ०६ एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ,राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर कोपरगाव शहरात पंचायत समिती,कोपरगाव शहर पोलीस ठाणे,राज्य परिवहन मंडळाचे कोपरगाव बस आगाराचे उदघाटनासाठी येत आहे.त्याच वेळी आपण त्यांचे हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे उदघाटन करून घेऊ असा विचार प्रवाह सुरु झाला असता त्यासाठी आज सकाळी मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची शहरात बैठक संपन्न झाली होती.

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या आवारात जमा झालेला जमाव दिसत आहे.

दरम्यान सदर उदघाटनास एका गटाने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या हस्ते विरोध केल्याचे दिसून आले आहे.तर दुसऱ्या गटाने मग लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा समीतीतचे अध्यक्ष सुखदेव जाधव यांचे हस्ते उदघाटन करण्याचे निश्चित करण्यात आले होते.मात्र हा विचार काही तरुणांना पसंत पडला नाही.त्यातील एकाने आज आपल्या पत्नीला घेऊन सायंकाळी ०५ वाजेच्यास सुमारास पुतळा चबुतऱ्यावर जाऊन परस्पर उदघाटन करून घेतले आहे.त्याचे नाव शरद त्रिभुवन असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.त्यामुळे एकच गोंधळ उडाला असून याला समाज बांधवांनी विरोध केला आहे.

दरम्यान या घटनेची कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती हाती आली आहे.त्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या प्रमुख अधिकांऱ्यानी दुजोरा दिला आहे.त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close