जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या प्राध्यापक पी.एच.डी.प्रदान

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.दिपक सुखदेव बुधवंत यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी.पदवी प्राप्त झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य विजय ठाणगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

  

डॉ.दिपक बुधवंत यांनी “शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान वर्तन-संदर्भ २००९- २०१९” या विषयावर आपले शोधकार्य पूर्ण केले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  डॉ.दिपक बुधवंत यांनी “शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान वर्तन-संदर्भ २००९- २०१९” या विषयावर आपले शोधकार्य पूर्ण केले.यासाठी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या विभागप्रमुख डॉ.जे.पी.बिडलान यांचे मार्गदर्शन लाभले होते.याव्यतिरिक्त प्रो.विलास आवारी,डॉ.एस.एम.देवरे यांचेही मार्गदर्शन मिळाले होते.  

   त्यांनी मिळविलेल्या या शैक्षणिक यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य विजय ठाणगे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close