जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

जलसंपदाचे उपविभागीय अधिकारी… सेवानिवृत्त

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नाशिक जलसंपदा विभागात काम करताना उपविभागीय अभियंता तात्यासाहेब थोरात यांना आलेले अनुभव निश्चित दिशादर्शक आहे.त्यांच्या अनुभवाचा फायदा कोपरगाव तालुक्याला नक्कीच होईल असा आशावाद साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करून त्याचा सर्वोच्च उतारा मिळवल्याचा दावा या कारखान्याचे माजी उपाध्यक्ष मच्छीन्द्र टी. रोहमारे यांनी केला आहे.त्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

नाशिक जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी तात्यासाहेब थोरात हे आपल्या चाळीस वर्षाच्या सेवेतील सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती सोहळा कोपरगाव येथील महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे आज सकाळी आयोजित केला होता त्यावेळी ते उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे हे होते.

सदर प्रसंगी कोपरगावचे आ.व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे,संजीवनी साखर कारखाण्याचे संचालक विवेक कोल्हे,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक अरुण चंद्र,ज्ञानदेव मांजरे,नारायण मांजरे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माधवराव खिलारी,जयराम पाचोरे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप देवकर,माजी कार्यकारी अभियंता श्री मोरे,जाधव,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,माजी उपसभापती अर्जुन काळे,तालुका कृषी अधिकारी पंडित वाघेरे,माजी नगरसेवक मंदार पहाडे,जिल्हा परिषद उपअभियंता उत्तमराव पवार,जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी आर.एस.पंडोरे,जलसंपदा विभागातील अधिकारी,कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.नारायण बारे यांनी केले तर उपस्थितांना कोपरगाव नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप देवकर,नाशिक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे,बाळासाहेब थोरात,निलेश कोळगे,जगन्नाथ ढोले गुरुजी,कर्मवीर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष मच्छीन्द्र रोहमारे,राजेंद्र खिलारी,माजी उपविभागीय अधिकारी सुखदेव थोरात,तन्वी चव्हाणके,सेवा निवृत्त अभियंता तात्यासाहेब थोरात आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

थोरात यांनी आपले अनुभव सांगताना,”गोदावरी डावा कालवा पूर्ण क्षमतेने करण्यासाठी दोनशे अडीचशे अंतर पार केले होते व ते काम यशस्वीपणे पार पाडले आहे.आपल्या कार्यकाळात आपण २००-२५० अडीचशे लोकांना सामोरे गेलो पण एकाही शेतकऱ्यांवर खटला दाखल केला नाही.शेतकऱ्यांचे समाधान हीच कामाची खरी पावती असते असे सांगितले आहे.शेतकरी पाण्याची मागणी अधिकृत करत नसल्याने मोठा पेच निर्माण होते व वर्तमान व्यवस्था अयशस्वी होण्याचा धोका वाढला असल्याचे सूतोवाच केले आहे.व खंडाळा येथून कामाची सुरुवात करून त्या नंतर भंडारदरा,मुळा,कुकडी,आदी लाभक्षेत्राच्या ठिकाणी काम केले त्यावेळी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे काम करताना आलेले खडतर अनुभव व कामात आलेल्या अडचणी सांगितल्या आहे.व आगामी काळात सामाजिक काम करताना आनंद होईल असे सूतोवाच केले आहे.सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी गोदावरी कालव्यांना थोरात यांनी शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याने पूर्ण क्षमतेने पाणी दिले.व आगामी काळात हे पाणी असेच देता येईल त्यासाठी चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे व त्यांनी या कोपरगाव उपविभागात अधिकारी येत नाही हा समज खोटा ठरवलेला असल्याचे व त्यांना अधिकची मुदत वाढ द्यावी अशी मागणी आ.काळे यांचेकडे व्यासपीठावर केली आहे.

यावेळी बोलण्याच्या उत्साहात माजी उपाध्यक्ष मच्छीन्द्र टी.रोहमारे यांनी अद्याप ऊस कार्यक्षेत्रात असताना व त्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस पेटवून देण्याचा अनास्था प्रसंग ओढवला असताना त्यांनी आ.काळे यांचे कौतुक करताना त्यांनी सहकारी कारखान्याचे कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करून त्याचा सर्वोच्च उतारा मिळाल्याचा अजब दावा केला आहे.

जलसंपदाचे अधिकारी पवार आदींनी आपले अनुभव विषद केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण सर यांनीं केले तर उपस्थितांचे आभार माजी उपसभापती अर्जुन काळे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close