जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

आगामी जिल्हा परिषद निवडणूक पाहून चारीचे भूमिपूजन होणार !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   निळवंडे कालव्यांचे काम अद्याप संपलेले नसताना व चारी क्रं.०४ ची नाशिक येथील सी.डी.ओ.मेरी कडून कुठलीही मंजुरी मिळाली नसताना उद्या कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी वितरिका क्रं.०४चे कोपरगाव तालुक्यातील मनेगाव येथे भूमिपूजन कार्यक्रम ठेवून दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका निळवंडे कालवा कृती समितीचे माजी उपाध्यक्ष रमेश दिघे यांनी केली आहे.त्यामुळे हा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढविण्याचा फंडा असल्याचे उघड झाल्याने दुष्काळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान याबाबत माहिती घेतली असता गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता,नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता,अहिल्यानगर येथील जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता,निळवंडे धरणाचे आणि कालव्यांचे कार्यकारी अभियंता आदींची महामंडळ सदस्य समितीची सोमवार दिनाक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी बैठक संपन्न होणार असून त्यात हा विषय होणार असल्याची माहिती हाती आली आहे.(निर्णय होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही) मात्र अद्याप वितरण चारी क्रं.०४ ला अद्याप मंजुरी नाही ही बाब सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असल्याचे उघड झाले आहे.

  

हेच ते माहिती अधिकारातील पत्र.त्यात अद्याप वीतरिका क्रं.०४ अद्याप मंजूर नाही.

     सदरचे सविस्तर वृत्त असे की,”निळवंडे कालवा कृती समितीने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील १८२गावातील दुष्काळी शेतकऱ्यांना निळवंडे धरणाचे पाणी मिळावे यासाठी सन-२००६ पासून अनेक आंदोलने केली होती.त्यातील तळेगाव दिघे आणि निर्मळ पिंपरी येथील आंदोलने विशेष गाजली होती.१० ऑगस्ट २०१४ रोजी ऐन राखी पौर्णिमेच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सभेत शांत बसलेल्या शेतकऱ्यांवर काही राजकारणी लोकांनी पोलिसांचा वापर करून बेछूट लाठीमार केला होता.सदर आंदोलन देशभर गाजेले होते.केंद्रातून निधी मिळण्यासाठी निळवंडे धरणासाठी खा.भाऊसाहेब वाकचौरे याचे मार्फत १७ पैकी १४ मान्यता मिळवल्या होत्या.उर्वरित मान्यता मिळविण्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांचे मोफत विधी सहाय्याने उच्च न्यायालयात याचिकाकर्ते नानासाहेब जवरे,विक्रांत रुपेंद्र काले यांनी जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल करून उर्वरित तीन मान्यता मिळवून सदर प्रकल्प ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळवले होते.त्यानुसार मोठ्या न्यायिक व रस्त्यावरील संघर्षाने निळवंडे धरणाचे पाणी आणल्यानंतर बहुतांशी सर्व गावांना निळवंडे धरणाचे पाणी पाझर तलाव,के.टी.वेअर आदींच्या सहाय्याने ३१ मे २०२३ नंतर पाणी उपलब्ध झाले होते.मात्र ज्यांनी मोठा संघर्ष केला,लाठ्या काठ्या खाल्ल्या,जेलमध्ये जावे लागले,अनेक गुन्हे दाखल करून घ्यावे लागले त्या जवळके,बहादरपुर आदी गावांसह संघर्षशील गावांना मात्र गेली दोन अडीच वर्षे पाणी मिळत नव्हते.त्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,सेवानिवृत्त उपअभियंता सुखदेव थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,सदस्य आदींनी सर्वात प्रथम वेस पाझर तलावापासून पाणी जवळके नदीत सोडण्याची व नदीजोड करण्याची सर्वात प्रथम मागणी करून शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना वेस बंधाऱ्याजवळ असलेल्या सोसायटीजवळ भेट देऊन तेथून पूर पाणी ‘हॉटेल मनोदिप’ पर्यंत आणण्याची संकल्पना मांडली होती.

हेच ते माहिती अधिकारातील पत्र ज्यात मुद्दा क्रं.०३ मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की,वितरीका क्रं.०४ चे संकल्पन सि.डी.ओ.मेरीकडे मुल्यारपणास्तव सदर करण्यात आले आहे.

कोपरगाव,संगमनेर आणि राहाता तालुक्यातील पुढाऱ्यांना आपल्या निवडणुका काढण्याची नेहमी प्रमाणे घाई झाली असून त्यांनी या पूर्वीही २७ जानेवारी २००४ रोजी वाळकी फाटा आणि रांजणगाव देशमुख माथा या दोन ठिकाणी तत्कालीन खा.बाळासाहेब विखे,तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री बाळासाहेब थोरात,माजी खा.शंकरराव काळे,आ.शंकरराव कोल्हे,माजी आ.दादा पाटील रोहमारे आदी सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी आता निळवंडे कालव्याना कोणाची विरोध उरला नसून ते लवकरच होणार असल्याचे शुद्ध थाप मारून उद्घाटन करून दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळून आपल्या लोकसभा निवडणुकीच्या सत्तेची पोळी भाजून घेतली होती.

  

  जवळके ग्रामपंचायतने त्याची रीतसर व वेळोवेळी मागणी करून लेखी पाठपुरावा केला आहे.आता त्यासाठी अंजनापुर येथील बंधाऱ्याची आरेखंन मंजुरीसाठी दि.०९ नोव्हेंबर २०२५ रोजी (दै.सार्वमत) निविदा जारी झाली आहे.विशेष म्हणजे आता कुठे एका दैनिकात त्याचे आरेखन करण्याची निविदा सुशिक्षित बेरोजगार तरुणास साठी मंजूर झाली असून त्याचे आरेखन मंजूर झाल्यावर त्यावर कोणती योजना सोयिस्कर आणि कमी खर्चिक आहे यावर उहापोह होणार आहे त्यानंतर अंतिम आरेखन (डिझाईन) वेस बंधारा की अंजनापुर बंधारा याच्या खर्चाने अंदाजपत्रक पाहून ते कमी खर्चाचे जे असेल ते  मंजूर होणार आहे.मात्र कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील पुढाऱ्यांना आपल्या निवडणुका काढण्याची नेहमी प्रमाणे घाई झाली असून त्यांनी या पूर्वीही २७ जानेवारी २००४ रोजी वाळकी फाटा आणि रांजणगाव देशमुख माथा या दोन ठिकाणी तत्कालीन खा.बाळासाहेब विखे,तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री बाळासाहेब थोरात,माजी खा.शंकरराव काळे,आ.शंकरराव कोल्हे,माजी आ.दादा पाटील रोहमारे आदी सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी आता निळवंडे कालव्याना कोणाची विरोध उरला नसून ते लवकरच होणार असल्याचे शुद्ध थाप मारून उद्घाटन करून दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळून आपल्या लोकसभा निवडणुकीच्या सत्तेची पोळी भाजून घेतली होती.यावेळीही वर्तमान लोकप्रतिनिधी आ.काळे यांनी त्याची आपले आजोबा माजी खा.शंकरराव काळे यांचे प्रमाणे डाव टाकला आहे.त्याबाबत दुष्काळी शेतकऱ्यांनी कुठलाही विश्वास ठेवू नये असे आवाहन निळवंडे कालवा कृती समितीचे माजी उपाध्यक्ष रमेश दिघे यांनी शेवटी केले आहे.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने वरिष्ठ पातळीवर माहिती घेतली असता,”ज्यात गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता,नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता,अहिल्यानगर येथील जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता,निळवंडे धरणाचे आणि कालव्यांचे कार्यकारी अभियंता आदींची महामंडळ सदस्य समितीची सोमवार दिनाक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी बैठक संपन्न होणार असून त्यात हा विषय होणार असल्याची माहिती हाती आली आहे.(निर्णय होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही)मात्र अद्याप वितरण चारी क्रं.०४ ला अद्याप मंजुरी नाही ही बाब सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे आगामी निवडणुका पाहून हा कोपरगाव तालुक्यातील पुढाऱ्यांनी आपल्या मतांच्या झोळ्या भरण्यासाठी निवडणुका फंडा वापरला असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close