जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

रस्त्यातील गणपती मंडळे हटवली,कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरात काल गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर एकूण शहर आणि १० गावे मिळून मोठे सार्वजनिक गणपती ७०,लहान सार्वजनिक गणपती ४३,एक गाव एक गणपती दोन ,डाऊच खुर्द,आणि डाऊच बुद्रुक,एकूण ११५ गणपती शहर हद्दीत ८ वाजेच्या आत बसविण्यात आले असून शहरात राष्ट्रपिता महात्मागांधी यांच्या पुतळ्यासमोर आणि एस.जी.रस्त्यातील वाहतुकीस अडथळा ठरणारे स्थानिक शनी चौक आदी ठिकाणचे रस्त्यातील गणपती मंडळे हटविले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहेत.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान महात्मा गांधी चौकात ऐन गांधी पुतळ्यासमोर एका मंडळाने गणपती बसवला होता त्याला यावर्षी छेद देण्यात आलेला आहे.त्यामुळे ऐन गणपती उत्सवात पाहिल्यादा गांधी पुतळ्याने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले आहे.यात सत्ताधारी गटाला धक्का मानला जात आहे.नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत होती मात्र कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक देसले यांनीं कारवाई केल्याने नागरिकांनी कौतुक केले आहे.मात्र या गणेश मंडळाला पालिकेने परवानगी दिलीच कशी असा सवाल निर्माण झाला आहे.

गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे.तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे.या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो.भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली.या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला.गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला होता.आता हा महोत्सव सातासमुद्रापार गेला आहे.त्याला महाराष्ट्रात विशेष महत्व आहे.कोपरगाव शहर त्याला अपवाद नाही.राज्यासह कोपरगावातही हा उत्साह पाहायला मिळाला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने ऐन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरच एका गणेश मंडळाला गणपती बसविण्याची परवानगी दिली होती.त्यामुळे हा राष्ट्रपित्यांचा पुतळा पूर्ण झाकला गेला होता.मात्र शहर पोलिसांनी योग्यवेळी कारवाई केल्याने या राष्ट्रपित्याचा श्वास मोकळा झाला आहे त्याचे छायाचित्र.

सकाळपासून गणेशाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती.टीचस ओबत कृत्रिम फुले आणि त्यांचे हार यांची यावेळी मोठी चलती असल्याचे दिसून आले आहे.गुरुद्वारा रस्ता आणि मुख्य रस्ता यावर हि गर्दी आढळून आली आहे.

दरम्यान यावेळी कोपरगाव शहर पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान हिंदू सकल मंडळ यांनी भर रस्त्यात गणपती व्यास पीठ उभारले होते ते सूचना देऊनही त्याचे पालन केले नाही म्हणूंन काल सकाळी ११ वाजता पोलिसांनी कारवाई केली त्यात काही कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई केली आहे त्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता.मात्र पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने गणपती मंडळाचे कार्यकर्ते सुतासारखे सरळ केले आहे.त्याबाबत शहरातील अन्य गणपती मंडळांना चांगलाच बोध मिळणार आहे.त्यात शनी चौक,अध्यक्ष मंगेश पवार यास कडक शब्दात समज दिली होती.मात्र त्या नंतर त्यानी पालन केले आहे त्याबद्दल पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.मात्र पोलिसांचे डी.जे.आणि त्यांच्या आवाजावर व वेळच्या बांधनावर चांगलेच लक्ष राहणार असल्याचेही देसले यांनी शेवटी सांगितले आहे.

दरम्यान मात्र याठिकाणी आगामी काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती अवघी एक महिन्यावर येऊन ठेपली असताना कोपरगाव नगरपरिषदेने या ठिकाणी परवानगी दिलीच कशी असा सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे हा राष्ट्रपुतळा पूर्ण झाकला गेला होता.मात्र शहर पोलिसांनी योग्यवेळी कारवाई केल्याने या राष्ट्रपित्याचा श्वास मोकळा झाला असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close