पर्यटन व तीर्थक्षेत्र
…या तीर्थक्षेत्रासाठी निधीची मागणी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा हे दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाते.येथील श्री योगीराज चांगदेव महाराज व कार्तिक स्वामी महाराज मंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तसेच गोदावरी नदीवरील घाट पुनर्बांधणी व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा,अशी मागणी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पुणतांब्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महान योगी संत चांगदेव महाराज यांचे समाधीस्थान येथे आहे.त्यांनी येथे अनेक वर्षे तपश्चर्या केली होती.हे गाव गोदावरी नदीच्या पवित्र काठावर वसलेले आहे,ज्यामुळे याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.पुणतांब्यात सुमारे ४०० वर्षांपूर्वींची अनेक पुरातन मंदिरे आहेत.यात चांगदेव महाराज मंदिर,काळभैरवनाथ मंदिर,विठ्ठल-रुक्मिणी मंदिर,कार्तिक स्वामी आणि अनेक शिवमंदिरांचा समावेश आहे.मात्र त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे.
श्री क्षेत्र पुणतांबा हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील व तालुका राहाता(पूर्वी कोपरगाव) गोदावरी नदीच्या काठावर वसलेले एक अत्यंत प्राचीन आणि धार्मिक क्षेत्र आहे.या गावाला पौराणिक,ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.पुणतांब्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महान योगी संत चांगदेव महाराज यांचे समाधीस्थान येथे आहे.त्यांनी येथे अनेक वर्षे तपश्चर्या केली होती.हे गाव गोदावरी नदीच्या पवित्र काठावर वसलेले आहे,ज्यामुळे याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.पुणतांब्यात सुमारे ४०० वर्षांपूर्वींची अनेक पुरातन मंदिरे आहेत.यात चांगदेव महाराज मंदिर,काळभैरवनाथ मंदिर,विठ्ठल-रुक्मिणी मंदिर,कार्तिक स्वामी आणि अनेक शिवमंदिरांचा समावेश आहे.मात्र त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे यांचा जीर्णोद्धार करणे गरजेचे बनले आहे.त्यामुळे माजी आ.कोल्हे यांनी ही मागणी केली आहे.

त्यांनी आपल्या मागणीपत्रात म्हटले आहे की,”अहिल्यानगर जिल्हा हा ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला जिल्हा असून येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत.कोपरगाव मतदारसंघातील पुणतांबा गावाला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक येथे श्री चांगदेव महाराज समाधी,श्री कार्तिक स्वामी मंदिर तसेच गोदावरी नदीकाठी असलेल्या अहिल्यादेवी होळकर घाट,विठ्ठल घाट आणि ब्राह्मण घाट येथे दर्शनासाठी येत असतात.

सन-२०२७ मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून त्यासाठी लाखो भाविक राज्यभरातून येणार आहेत.त्याचा परिणाम म्हणून पुणतांबा येथील तीर्थक्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याने येथे घाट पुनर्बांधणी,सहइतर मूलभूत सुविधांचा विकास तातडीने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.या धार्मिक स्थळांचा परिसर अधिक विकसित व आकर्षक व्हावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पुणतांबा येथील योगीराज चांगदेव महाराज व कार्तिकस्वामी महाराज मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास,गोदावरी नदीवरील घाट पुनर्बांधणी आणि भाविकांसाठी अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याबाबत संबंधित विभागांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी माजी आ.कोल्हे यांनी शेवटी केली आहे.


