कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहर विकासावरून रंगला दोन नेत्यांत कलगीतुरा!

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव येथील नाईक बिल्डर,आणि पांडे बिल्डर आदींना काहीही मदत लागली तर नक्की करू असे आश्वासन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे यांनी करून कोल्हे-परजणे हा कलगीतुरा पाहून आपले भाषण आखडते घेतले असल्याचे उघड झाले आहे.त्यावेळी विवेक कोल्हे आणि राजेश परजणे यांच्यात मार्च महिन्यात पोलिस ठाण्याच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर दुसऱ्यांदा राजकीय कलगी तुरा रंगल्याचे व आपले तोंड दुसऱ्यांदा पोळून घेतल्याचे उघड झाले आहे.याबाबत शहर आणि तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोपरगाव शहराची पूररेषा कमी करून विकास करू असे सांगितल्यावर राजेश परजणे यांनी संधान यांनी पूररेषा कमी करण्याच्या बोलण्याचा धागा जोडत,”आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे सहाय्य घेऊ अशी पुष्टी जोडून संधान यांना तुम्हाला पालकमंत्र्यांना सोडून पुढे मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे जाता येणार नाही याची जाणीव करून दिल्याने याची उपस्थितांत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.त्यावेळी विवेक कोल्हे यांनी तुम्ही आमचे बरोबर आहे असे सुचवताच त्यांनी मी तुमच्या मागे आहे.असे सांगून उपस्थित नेत्यांना आपल्या उपस्थितीची आणि आपल्याला टाळून न जाण्याचे अप्रत्यक्ष सुतोवाच केल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे.तर विवेक कोल्हे यांनी परजणे यांच्यावर बोलण्याचे टाळून दोन पावले पिछेमुड केल्याचे आढळून आले आहे.
कोपरगाव येथील प्रसिद्ध नाईक बिल्डरचे संचालक प्रसाद नाईक यांचे नाविन्यपूर्ण संकल्पनेतून साकार झालेल्या,”रचना स्क्वेअर” या कॉम्प्लेक्सचा शुभारंभ व नवीन निवासी इमारतीचे भूमिपूजन सोहळा आज सायंकाळी ०७ वाजता कोपरगाव विधानसभा आ.आशुतोष काळे यांचे हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रसाद नाईक यांच्या मातोश्री श्रीमती नाईक यांचा सत्कार आ.आशुतोष काळे,विवेक कोल्हे,राजेश परजणे यांनी शाल,पुष्पगुच्छ देऊन केले आहे.त्यावेळी मातोश्रींना डोळ्यातील अश्रू आवरता आले नाही.

सदर प्रसंगी सहकार महर्षी कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,गोदावरी-परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,दत्तात्रय कोल्हे,ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष व बी.एस.एन.एल.चे संचालक रवींद्र बोरावके,क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे,माजी नगरसेवक दिनार कुदळे,सतीश पांडे,कल्पेश पांडे,कौस्तुभ पांडे,कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,माजी नगराध्यक्ष पदकांत कुदळे,मंगेश पाटील,संजय सातभाई,ॲड.शंतनु धोंडे,डॉ.दत्तात्रय मुळे,नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र काले,महर्षी कारखान्याचे संचालक विश्वास महाले,आदी मान्यवरांसह नागरिक,व्यापारी,महिला बहुसंख्येनं उपस्थित होते
यावेळी विवेक कोल्हे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव शहराचा डी.पी.आर.बदलू,नागरिकांना शुद्ध पाण्याचे काम करावे लागणार आहे.परजणे यांचे बोलण्याचा धागा जोडून दोन पावले मागे जात येथून फाईल अहिल्यानगर येथे पाठवण्याचे काम करून नगरातून पुढे पाठवण्याचे काम तुम्हाला करावे लागेल असे सांगूनपुढील धोका अप्रत्यक्ष मान्य केल्याचे दिसून आले व बचावात्मक पवित्रा घेतला आहे.शहरात ‘नमो पार्क’ करत असल्याचे सांगितले आहे.शेवटी सिंचनाचे पाणी कपात झाले असल्याचे सांगून शेती पाण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ असे शेवटी आवाहन केलं आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाईक बिल्डरचे संचालक प्रसाद नाईक यांनी केले त्यावेळी त्यांनी आपण २०१० साली या क्षेत्रात उतरलो.आमचे पिताश्री स्व.सुभाष नाईक स्थापित ‘नाईक बिल्डर ‘फर्मचे नाव निवासी क्षेत्रात नाव होते.पण व्यापारी क्षेत्रात मात्र शंका होती.पण आपण व दिनार कुदळे आदींनी पुणे येथे जाऊन अनेक प्रकल्प दाखवले होते.त्यापासून प्रेरणा घेऊन या व्यवसायात उतरलो आणि आज यशस्वी झालो आहे.आणि आज काळे-कोल्हे,परजणे आदींचा यशाचा मंत्र घेऊन काम सुरू केले आहे.स्व. पूरब कुदळे यांचे नंतर २०१६ साली दिनार कुदळे बरोबर आले.आणि आम्हाला चांगली साथ मिळाली असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.पुणे येथील प्राविण्य आणण्याचे काम आम्ही,आमचे अभियंते,आणि कर्मचारी आदींनी केले आहे.त्यातून आमचा आत्मविश्वास वाढला असल्याचे सांगितले आहे.त्यावेळी माजी आ.स्नेहलता कोल्हे,आ.आशुतोष काळे,विवेक कोल्हे,राजेश परजणे यांचे सहकार्याचे कौतुक करून चांगलाच समतोल साधल्याची व आरती ओवाळल्याची चर्चा उपस्थितांत सुरू झाली होती.मागे सुरू होत असलेल्या निवासी इमारतीचे काम १५ मजल्याचे काम होत असून त्यात दोन मजले पार्किंगसाठी तर शेवटचा मजला व्यायामासाठी राखीव असल्याचे शेवटी सांगितले आहे.
यावेळी नगराध्यक्ष पराग संधान,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे आदींनी मनोगत व्यक्त केले आहे.तर सूत्रसंचालन सागर मोरे यांनी केले तर आभार दिनार कुदळे यांनी मानले आहे.



