निवड
भाजपच्या उपजिल्हाध्यक्ष पदी…या कार्यकर्त्याची निवड!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर भाजपचे निष्ठावान माजी अध्यक्ष प्रभाकर वाणी यांचे सुपुत्र योगेश वाणी यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी केल्याने या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

योगेश वाणी यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या विजयात मोठे योगदान असल्याचे मानले जात आहे.त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी वैचारिक नाळ जोडली गेली असल्याचे भाजप परिवारात बोलले जाते.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ही उपाध्यक्ष पदाची निवड झाली असल्याचे मानले जात आहे.
योगेश प्रभाकर वाणी यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील असून त्यांचे आजोबा तुकाराम यादवशेठ वाणी हे प्रथम कोपरगाव शहरात व्यवसायानिमित्त आले होते आणि कायमचे कोपरगाव शहराचे होऊन गेले आहे.त्यांचे आजोबा तुकारामशेठ वाणी यांनी पारोळा तालुक्यात बहादरपुर गावात संघ कार्यशाळा आणि तिचे विचार घराघरापर्यंत पोहचवण्याचे कार्य केले होते.तत्कालीन संघाचे नेते स्व. उत्तमराव पाटील पुलोद सरकार मध्ये महसूलमंत्री असताना त्यांचे सोबत काम केल्याचा अनुभव त्यांच्या गाठीला होता.त्यांच्या बंडखोर विचारधारेमुळे त्यांचे आजोबांनी त्यांची रवानगी कोपरगाव सारख्या बारमाही बागायती भागात केली असल्याचे बोलले जाते.त्यांचे नंतर त्यांचे सुपुत्र प्रभाकर वाणी यांच्या कार्याची दखल घेऊन वरिष्ठ नेत्यांनी त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी,कोपरगाव शहराध्यक्षपदी निवड केली होती.त्यांचेनंतर आता योगेश वाणी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.त्यांच्या भाजप निष्ठेला आणि कार्याला आता फळ आले असल्याचे मानले जात आहे.

योगेश वाणी यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या विजयात मोठे योगदान असल्याचे मानले जात आहे.त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी वैचारिक नाळ जोडली गेली असल्याचे भाजप परिवारात बोलले जाते.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ही उपाध्यक्ष पदाची निवड झाली असल्याचे मानले जात आहे.
नूतन जिल्हा उपाध्यक्ष योगेश वाणी यांच्या निवडीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी आ.स्नेहलता कोल्हे,आ.आशुतोष काळे,आ.विवेक कोल्हे,बी.एस.एन.एल.चे संचालक रवींद्र बोरावके,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींसह अनेकांनी स्वागत केले आहे.



