करमणूक
जीवनात आनंदाचे क्षण देणारा उपक्रम-ॲड.बोरावके

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मनुष्याच्या जीवनातील ताणतणाव घालवून तणावमुक्त जीवनात निख्खळ आनंदाचे चारक्षण देणारा समुह म्हणजे “कराओके” असून हा गायकांच्या समुह असल्याचे प्रतिपादन ग्रीड इंडियाचे संचालक व ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड.रवींद्र बोरावके यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव येथील,”कराओके सिंगर्स क्लब यांचे तृतीय वर्षपूर्ती निमित्त ग्रीड इंडिया संचालक ॲड.रवींद्र बोरावके,पुष्पाताई काळे,ज्योती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,कोपरगांव,संजीवनी युवा प्रतिष्ठान,हाॅटेल भागिरथीचे संचालक गणेश आढाव,कराओके समुहाचे प्रमुख राजेंद्र कोयटे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
ज्योती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,कोपरगांव,संजीवनी युवा प्रतिष्ठान,हाॅटेल भागिरथीचे संचालक गणेश आढाव यांच्या सौजन्याने आणि कराओके समुहाचे प्रमुख राजेंद्र कोयटे यांच्या संकल्पनेतून कोपरगांवातील हौशी गायकांच्या सहभागातून रोहित दुग्गल म्युझिक (आर.डी.म्युझिक) अॅकॅडमी,श्रीरामपूर,वादकांसमवेत लाईव्ह ऑर्केस्ट्रा हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील गाण्यांची सुरेल मैफील “ये शाम मस्तानी म्युझिकल कॉन्सर्ट” विशेष कार्यक्रमाचे आयोजन कृष्णाई बँक्वेट हॉल,कोपरगांव येथे करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव येथील,”कराओके सिंगर्स क्लब यांचे तृतीय वर्षपूर्ती निमित्त ग्रीड इंडिया संचालक ॲड.रवींद्र बोरावके,पुष्पाताई काळे,ज्योती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,कोपरगांव,संजीवनी युवा प्रतिष्ठान,हाॅटेल भागिरथीचे संचालक गणेश आढाव,कराओके समुहाचे प्रमुख राजेंद्र कोयटे,रेणुका कोल्हे,गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संजीवनी सैनिकीचे संचालक सुमित कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान,माजी नगरसेवक गणेश आढाव,स्वच्छतादूत सुशांत घोडके,सागर बडदे आदींसह वैद्यकीय,विधीज्ञ,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगांवातील स्थानिक हौशी गायकांनी वाद्यवृंद यांच्या तालावर आपली गायकी सादर केली यात सहभागी गायक-गायिकांमध्ये प्रा.डॉ.धनंजय क्षीरसागर,अनिल गिड्डे,डॉ.विलास आचारी, प्रा.हरेश चौधरी,अॅड.श्रद्धा जवाद,शंकरलाल टाक,प्रा.डॉ लक्ष्मीकांत धामंदे,इलियास सय्यद,अनिल जगताप,डॉ.समीर शहा,वसंतराव शिलेदार,कैलास सोमासे,रवी पाटील,प्रिया ठोळे,सुधीर (राजू) कोयटे,वर्षा सोनवणे,डॉ.अरुण भांडगे,कल्याणी बनसोडे,वृंदा को-हाळकर,डॉ.सोनिया रणदिवे,प्रमोद को-हाळकर,अॅड.नरेंद्र संचेती,सतीश भोकरे,डॉ.निलेश काबरा,छाया वैद्य, दीपाली क्षिरसागर,मेजर राजेंद्र जगताप,राजेंद्र सोनवणे,प्रा.मिलिंद मुखेडकर,प्रवीण सोमवंशी,विवेक बिडवे,संगीता बनसोडे,डॉ.सुषमा आचारी,राहुल लांडे,गोरख वैद्य,सतिष गर्जे,स्विटी भुसारी आदीसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे निवेदन कराओके समुहाचे प्रमुख राजेंद्र कोयटे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार प्रिया ठोळे यांनी मानले आहे.
दरम्यान यावेळी उपस्थित श्रोत्यांनी रोमँटीक,भाव,विरह गीतांचा आनंद लुटला आहे.कोपरगांवातील स्थानिक गायकांच्या गायनाचा आनंद घेण्यासाठी कोपरगांवकर रसिकांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले आहे.



