जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात विहिरीत पडून पतीपत्नीचा मृत्यू

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर शिवारातील शेतकरी गणेश रहाणे यांच्या गट क्रं.८५/१ मध्ये विहिरीचे काम सुरु असताना त्या ठिकाणी क्रेन शॉप्ट व वायर रोप तुटून झालेल्या अपघातात मजूर म्हणून असलेले जोडपे जेठालाल जग्गू भिल्ल (वय-४५) व त्याची पत्नी शांती जेठालाल भिल्ल (वय-३०) रा.मोखमपुरा ता.आसिद जि.भिलवाडा राजस्थान हे जागीच ठार झाले आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संकल्पित छायाचित्र

मुर्शतपुर येथे राजस्थानी मजुरामार्फत शेतकरी गणेश रहाणे यांच्या विहिरीचे काम तब्बल १०५ फुट झालेले आहे.काम अंतिम टप्यात असताना आज दि.२४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सबंधित मजूर जोडपे हे विहिरीत क्रेन माल्डीच्या सहाय्याने उतरत असताना अचानक वायर रोप व क्रेनच्या शॉप्ट तुटला व क्रेन चालकांचे या क्रेनवरील नियंत्रण सुटले व त्या नंतर झालेल्या अपघातात वरील जेठालाल भिल्ल व शांती भिल्ल हे जोडपे जागीच ठार झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,खबर देणार गणेश कारभारी रहाणे हा इसम येसगाव येथील शेतकरी असून त्याने एक वर्षापूर्वी दहा एकर क्षेत्र विकत घेतले होते.मात्र वर्तमानात विहीर करण्यासाठी राज्यातील मजूर उपलब्ध होत नसल्याने त्यांनी विहीर घेण्याचे काम राजस्थानी ठेकेदार व मजुरांना दिले होते.राजस्थानी ठेकेदाराने आपल्या विहिरीच्या कामासाठी राज्यात मजूर मिळत नसल्याने राजस्थान येथून मजूर आणलेले आहे.त्याने त्या मजुरामार्फत मुर्शतपुर येथील विहिरीचे काम घेतलेले होते.त्या विहिरीचे काम तब्बल १०५ फुट झालेले आहे.काम अंतिम टप्यात असताना आज दि.२४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सबंधित मजूर जोडपे हे विहिरीत क्रेन माल्डीच्या सहाय्याने उतरत असताना अचानक वायर रोप व क्रेनच्या शॉप्ट तुटला व क्रेन चालकांचे या क्रेनवरील नियंत्रण सुटले व त्या नंतर झालेल्या अपघातात वरील जेठालाल भिल्ल व शांती भिल्ल हे जोडपे जागीच ठार झाले आहे.विहिरीत पाणी नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.दरम्यान या दुर्घटनेनंतर नजीकच्या नागरिकांनी धाव घेऊन मृत कामगारांना बाहेर काढले होते.

कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचे शव विच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ठेकेदार रहाणे याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबतची खबर दिली आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक,पोलीस नाईक ढाकणे आदींनी भेट दिली आहे.

सदर प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रं.२८/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close