निधन वार्ता
रुग्णवाहिका सेवक शहा यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रुग्णवाहिका संघटनेचे अध्यक्ष शब्बीर शहा (वय-५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,असा परिवार आहे.तात्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोपरगाव शहर आणि परिसरात अशीच सलग ३० वर्ष सेवा बजावणारे शब्बीर शहा यांनी आपली सेवा बजावली होती.त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रुग्णवाहिका हे वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज वाहन असते ज्यात रूग्णालयांसारख्या उपचाराच्या ठीकाणी रूग्णांची ने-आण करण्यासाठी वापरतात.काही वेळेस रुग्णालयाबाहेरची वैद्यकीय सेवा देखील रुग्णवाहिकेत रुग्णाला पुरवली जाते.आपत्कालीन वैद्यकीय सेवांद्वारे रूग्णाला आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्यासाठी रुग्णवाहिका वापरल्या जातात.त्यासाठी खाजगी रुग्णवाहिका चालक आपली सेवा चोखपणे बजावत असतात कोपरगाव शहर आणि परिसरात अशीच सलग ३० वर्ष सेवा बजावणारे शब्बीर शहा यांनी आपली सेवा बजावली होती.त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.
स्व.शब्बीर शहा यांनी आपल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून कोपरगाव आणि परिसरातील शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले होते.त्यांच्या निधनाबद्दल अमित खोकले यांचेसह अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.