जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

श्री साईबाबा बाबत आक्षेपार्ह व्हिडीओ,गुन्हे दाखल करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा यांचे बाबत जयपुर येथील प्रवक्ता गिरीधर स्वामीजी यांचे प्रवचन सुरु असून त्यात साईबाबा बाबत आक्षेपार्ह विधान करून साईभक्तांच्या भावना दुखावल्या प्रकरणी येथील शिर्डी येथील नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा सेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले असून आरोपी विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

श्री साईबाबा हे १८५६-ऑक्टोबर १९१८ या दरम्यान एक भारतीय अवलिया व संत होऊन गेले आहे.अ.नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते.त्यांची जगभरात वाढलेली प्रसिद्धी पाहून काही विघ्नसंतोषी लोक त्यांचे विक्षिप्त माहिती व व्हिडीओ प्रकाशित करून त्यांची बदनामी करत आहे त्या विरोधात गुन्हा दखल करण्याची मागणी सेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी केली आहे.

श्री साईबाबा हे १८५६-१५ऑक्टोबर १९१८ या दरम्यान एक भारतीय अवलिया व संत होऊन गेले आहे.अ.नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते.येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला.शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.मात्र अलीकडील काळात साईबाबा बाबत काही आक्षेपार्ह लिखाण करून अथवा व्हिडीओ प्रकाशीत करून काही विक्षिप्त नागरिक प्रसिद्धी प्राप्त करून प्रसिद्ध होत आहे.हि बाब अत्यंत गंभीर असून त्याला आळा घालणे आवश्यक बनले आहे.अशीच घटना नुकतीच घडली असून यात जयपुर येथील प्रवक्ता गिरीधर स्वामीजी यांनी केली आहे.

या ‘यू ट्यूब’ वरील व्हिडीओ मध्ये प्रवचन सुरु आहे.सदर व्हिडीओ मध्ये प्रवचनाच्या दरम्यान एक व्यक्ती गिरीधर स्वामी यांना प्रश्न विचारत आहे.व प्रश्नामध्ये श्री साईबाबा हे देव आहे का ? श्री साईबाबांची पुजा हिंदुच्या मंदीरामध्ये करणे योग्य आहे का ? अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे.त्यावर प्रवचन कर्ते गिरीधर स्वामी यांनी उत्तर देताना श्री साईबाबा हे अफगाणिस्तान मधुन आलेले आहे.व ते मुस्लीम समाजाचे आहे.व त्यांचे नाव चाँद भाई आहे.त्यांनी आपला चेला गोविंद दाभोळकर यांच्याकडुन आपले चरित्र लिहुन घेतले.व ते चरित्र साई संस्थानने प्रकाशीत केले तसेच श्री साईबाबा अफगाणिस्तान मध्ये मुसलमानाचे पुत्र आहे.त्यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.या शिवाय अन्य एक चलचित्रणांत बांगलादेशातील व्हिडीओ पोस्ट करून सदर जमा पैसा मोजताना काही अल्पसंख्याक समाजातील नागरिक दिसत असून तो पैसा हजसाठी वापरला जात असल्याची चुकीची माहिती दिली जात आहे.हे अत्यंत निंदनीय काम सुरु आहे.सदर पोस्ट व व्हिडीओ काढून टाकाव्या व करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करणे गरजेचे बनले आहे.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी शेवटी सेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close