जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

निट परीक्षा आंदोलन,…या शहरात संमिश्र प्रतिसाद !

न्यूजसेवा

कोपरगांव -(नानासाहेब जवरे)
  
   आज,२३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीने नीट परीक्षा घोटाळा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली असताना आज त्याला कोपरगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.दुपारी जुन्या गावठाणात पुन्हा दुकाने पूर्ववत सुरू झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.या बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याचे पाहायला मिळाले आहे.

कोपरगाव शहरात बंद काळात दुपारपर्यंत नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी दिलेला प्रतिसाद  दिसत आहे.

कोपरगावसह राज्यातील विविध सेवा,खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले आहे.सरकारकडून शाळा,महाविद्यालये,बँका किंवा शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश दिलेले नव्हते.परिणामी सर्व व्यवहार नियमित सुरू असल्याचे दिसून आले आहे.कोपरगाव शहरातील मुख्य बाजार पेठ व्यापारी महासंघाने प्रतिसाद दिल्याने सकाळी 11.30 वाजेपर्यंत काही अंशी बंद ठेवण्यात आल्या होत्या.तर अत्यावश्यक सेवा असलेले दूध,वैद्यकीय सेवा,भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक सेवांवर बंदचा कोणताही परिणाम झालेला नाही.

   देशातील ‘नीट’ परीक्षेतील कथित पेपरफुटी व गैरव्यवहाराविरोधात दिल्लीसह देशभरात मोठे विद्यार्थी आंदोलन पेटले असून,यामुळे लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याला राजकीय पक्षांनी मोठे इंधन पुरवले असून त्यामुळे त्यातील गंभीरता वाढली आहे.त्यामुळे केंद्र सरकार सावध होऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदा तोंड उघडले असल्याचे दिसून आले आहे.दरम्यान त्यासाठी काल राज्याच्या वंचित आघाडीने बंदची हाक दिली होती.त्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते.मात्र हा बंद राजकीय स्वरूपाचा असल्याने सरकारने कोणतीही अधिकृत सुट्टी जाहीर केलेली नव्हती.कोपरगावसह राज्यातील विविध सेवा,खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले आहे.सरकारकडून शाळा,महाविद्यालये,बँका किंवा शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश दिलेले नव्हते.परिणामी सर्व व्यवहार नियमित सुरू असल्याचे दिसून आले आहे.कोपरगाव शहरातील मुख्य बाजार पेठ व्यापारी महासंघाने प्रतिसाद दिल्याने सकाळी 11.30 वाजेपर्यंत काही अंशी बंद ठेवण्यात आल्या होत्या.तर अत्यावश्यक सेवा असलेले दूध,वैद्यकीय सेवा,भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक सेवांवर बंदचा कोणताही परिणाम झालेला नाही.वंचित बहुजन आघाडीने व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दुकाने बंद न करण्याचे आवाहन केले होते.तथापि या पक्षाचा प्रभाव असलेल्या काही स्थानिक भागांतील बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी स्वच्छेने दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला होता मात्र दुपार नंतर दुकाने पूर्ववत सुरू केली असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

कोपरगाव शहरातील बंद बाबत आमच्या प्रतिनिधीने शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी दुपारी 12 वाजे पर्यंत बंदला शहरात जवळपास 80 टक्के प्रतिसाद मिळाला असून या बंद काळात कोणताही सूचित प्रकार घडला नसून पोलिसांनी या काळात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.तर कोपरगाव तालुका हद्दीत या बंदचा प्रभाव जाणवला नसल्याची माहिती ग्रामीण भागातील ग्रामस्थानी दिली असून त्याला तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे नागरिकांनी सुटेकचा निःश्वास टाकला आहे.

   दरम्यान कोपरगाव शहरातील जुने गावठाण आणि मुख्य स्टेशन रोडवर या बंदचा प्रभाव बऱ्यापैकी जाणवला आहे.मात्र कृषि उत्पन्न बाजार समिती,येवला रोड,धारणगाव रोड,टाकळी नाका आणि तत्सम उपनगरात या बंदचा प्रभाव जाणवला नाही.दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात जाऊन आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले असल्याचे दिसून आले आहे.त्यात त्यांनी,”देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा,दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला केला त्याचे  निलंबन करण्यात येऊन त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावे” आदी मागण्या केल्या आहेत.या बंदला जवळपास 80 टक्के प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती वंचितांचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजू कोपरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

   दरम्यान तहसीलदारांना दिलेल्या या निवेदनावर वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष घोडके,प्रकाश दुशिंग,बाबासाहेब कोपरे,संतोष कोपरे,देविदास गायकवाड,राजेंद्र मोकळ,आनंद कोपरे,संदीप दुशिंग,आकाश दुसिंग,हेमंत कोपरे,संतोष गायकवाड,अनिल रणनवरे आदींच्या सह्या आहेत.

कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन देताना वंचित आघाडीचे कार्यकर्ते दिसत आहेत.

   दरम्यान कोपरगाव शहरातील बंद बाबत आमच्या प्रतिनिधीने शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी दुपारी 12 वाजे पर्यंत बंदला शहरात जवळपास 80 टक्के प्रतिसाद मिळाला असून या बंद काळात कोणताही सूचित प्रकार घडला नसून पोलिसांनी या काळात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.तर कोपरगाव तालुका हद्दीत या बंदचा प्रभाव जाणवला नसल्याची माहिती ग्रामीण भागातील ग्रामस्थानी दिली असून त्याला तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे नागरिकांनी सुटेकचा निःश्वास टाकला आहे.तर शिव सेना उबठा गटाचे काही शिवसैनिक दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे कुच केले असल्याची माहिती काही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close