अपघात
नगर-मनमाड मार्गावर पुन्हा अपघात,एक ठार,ट्रक चालक फरार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरालगत असलेल्या नगर मनमाड रस्त्यावर साई कॉर्नर येथे अवजड ट्रक आणि बजाज सिटी १०० या दुचाकीचा (क्रमांक एम.एच.१७ वाय.५२४१) भीषण अपघात होऊन शिंगवे येथील दुचाकीस्वार अशोक तुकाराम भवर(वय- ५२) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती हाती आली आहे.ही घटना आज बुधवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील शिंगवे येथील रहिवासी पालक अशोक भवर हे मुलाच्या महाविद्यालयीन कामासाठी कोपरगाव येथे आले होते.महाविद्यालयीन काम आटोपून ते घरी शिंगवे येथे जात असताना ट्रकने त्यांना उडवले आहे.त्यातून हा भीषण अपघात झाला असल्याचे मानले जात असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील सतत होणारे अपघात ही वर्तमानात खरोखरच अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब बनली आहे.हा रस्ता शिर्डी-शनी शिंगणापूर यांसारख्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना जोडत असल्यामुळे येथे भाविक,विद्यार्थी आणि अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते.मात्र,गेल्या अडीच दशकांपासून या मार्गाला ‘मृत्यूचा सापळा’ म्हटले जात आहे.या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून,रस्त्याचे काम अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाचे असल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते.याला कारण जसे भरधाव वेग आणि अनियंत्रित वाहतूकअसे असले तरी कंटेनर,डंपर आणि इतर अवजड वाहने मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवली जातात,ज्यामुळे लहान वाहनांना (कार आणि दुचाकी) भीषण धडका बसतात.या मार्गावर कोपरगाव नजीक असलेल्या साईबाबा कॉर्नर,पुणतांबा फाटा चौफुली,कोपरगाव बेट चौफुली,सावळीविहीर आदी ठिकाणे तर ब्लॅक स्पॉट बनली आहे.या ठिकाणी कायम वाहतूक कोंडी होत असते.कोपरगाव तालुक्यानजिकच्या सर्वच तालुक्यातील आणि जिल्ह्यातील रस्ते चकचकीत झाले आहे.मात्र उत्तर नगर जिल्हा त्याला अपवाद मानला जात आहे.उत्तरेतील स्थानिक नेतृत्वाचे हे अपयश मानले जात आहे.परिणामी येथील नागरिक,प्रवासी किड्यांमुंग्यासारखे मरताना दिसत आहे.अशीच घटना आज दुपारी ०३ वाजेच्या सुमारास घडली असून यात एक दुचाकीस्वार अवजड ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला गेला असून त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच गतप्राण झाला आहे.तो शिंगवे तालुका कोपरगाव येथील रहिवासी असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील शिंगवे येथील रहिवासी पालक अशोक भवर हे मुलाच्या महाविद्यालयीन कामासाठी कोपरगाव येथे आले होते.महाविद्यालयीन काम आटोपून ते घरी शिंगवे येथे जात असताना ट्रकने त्यांना उडवले आहे.त्यातून हा भीषण अपघात झाला असल्याचे मानले जात असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.त्यांच्यावर आज रात्री ०८ वाजता शिंगवे येथील गोदावरी नदीच्या काठी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

दरम्यान अपघातानंतर अवजड ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.नजीकच्या नागरिकांनी याबाबत तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.पोलिसांनी या प्रकरणी राजस्थान येथील अज्ञात टाटा ट्रक (क्रमांक आर.जे.११ जी.जी.१६९९) वरील चालकावर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर हे करीत आहेत.

दरम्यान या अपघातामुळे साई कॉर्नर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याचे आढळून आले होते.काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.मात्र पोलिसा अधिकारी संदीप सोन्ने यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन ही वाहतूक कोंडी तातडीने दूर केली असल्याचे आढळून आले आहे.



