जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

कृषी अधिकाऱ्यांच्या वाहनाला अपघात,गंभीर जखमी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब कारभारी साबळे (वय -५४) यांचा नुकताच जुना मुंबई-नागपूर मार्गावर हिरो शाईन दुचाकी आणि महिंद्रा पीकअप यांच्यात अपघात झाला असून ते गंभीर जखमी झाले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांना आधी कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.त्यानंतर त्यांना नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे संदर्भांकित करण्यात आले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब साबळे यांचे छायाचित्र.

कोपरगाव पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब साबळे हे मियाबांकी वृक्षलागवडीचे काम पाहून गोधेगाव येथील दहीगाव बोलका येथे आपल्या हिरो शाईन या दुचाकीवरून येत असताना दिनाक २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता त्यांना समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.हा अपघात घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थानी याबाबतची खबर राज्य शासनाचे कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिली होती.त्यानंतर या घटनेची खबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन साबळे यांना तातडीने स्वतःच्या गाडीने कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.आता ते नाशिक येथे उपचार घेत आहेत.

  कोपरगाव पंचायत समितीत ते गेली अनेक वर्षे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.आपल्या मितभाषी स्वभावाने आणि कर्तव्यदक्षतेने ते कोपरगाव पंचायत समिती आणि कोपरगाव तालुक्यात लोकप्रिय आहे.ते गोधेगाव येथील दहीगाव बोलका येथे आपल्या हिरो शाईन या दुचाकीवरून येत असताना दिनाक २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता त्यांना समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यात त्यांच्या दोन बरगड्या,उजवा खांदा,उजव्या कानाला आणि डोक्याला गंभीर इजा झाली आहे.याशिवाय.मेंदूत रक्तस्राव झाला असल्याची माहिती आहे.हा अपघात घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थानी याबाबतची खबर राज्य शासनाचे कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिली होती.त्यानंतर या घटनेची खबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन साबळे यांना तातडीने कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून परजणे यांनी आपला महत्वाचा वेळ देऊन त्यांना तातडीने पुढील उपचारार्थ नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले आहे.आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हाती आली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  दरम्यान याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल असल्याची माहिती उपलब्ध झाली नाही.घटनेनंतर वाहनचालक फरार झाला असल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close