जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यात…इतके टक्के मतदान संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यातील पदवीधर मतदार संघात सर्वाधिक चुरशीची ठरलेली नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक आज संपन्न झाली असून आज कोपरगाव येथील केंद्रावर संपन्न झालेल्या या निवडणुकीत एकूण ०८ हजार ४ ६४ मतदारांपैकी एकूण ०३ हजार ४२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून त्यात ०२ हजार ५५४ पुरुष तर ८६६ स्रियांना आपला मतदानाचा हक्क बजावला असून त्याची टक्केवारी केवळ ४०.४१ टक्के आली असल्याची माहिती तहसीलदार विजय बोरुडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे,त्यांची धर्मपत्नी चैताली काळे,माजी आ.अशोक काळे,यांचे सह त्यांची धर्मपत्नी पुष्पां काळे आदींनी सुरेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय केंद्रात तर माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनीचे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,अध्यक्ष विवेक कोल्हे आदींनी आपला अधिकार कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील जिल्हा परिषद शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज निवडणूक संपन्न झाली असून,नाशिक पदवीधर मतदारसंघात काय घडलंय ? आणि त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघालं होतं हे सगळ्यांनीच पाहिलं आहे.मात्र,या सगळ्यात सर्वांच्या नजरा होत्या,त्या भाजपकडे.अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या सत्यजित तांबेंनी ना भाजपला पाठिंबा मागितलाय ना भाजपने सत्यजित तांबेंना जाहीरपणे पाठिंबा दिला होता.मात्र,नेत्यांच्या विधानांतून भाजप नेमकं कुणाच्या बाजूने असणार आहेत,याचे संकेत मिळाले होते.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसनं सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली,पण त्यानी अर्ज भरलाच नाही.त्यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.महत्त्वाचं म्हणजे इतर चारही मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या भाजपनं नाशिकमधून मात्र कुणाला उमेदवारी दिली नाही आणि उशिरापर्यंत पाठिंबाही जाहीर केलेला नव्हता.त्यामुळे मोठी उत्सुकता वाढली होती.दरम्यान आदल्या दिवशी मात्र याबाबत पक्षाने याबाबत सर्व अधिकार राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना दिले असल्याचे जाहीर केले होते.त्यामुळे आगामी खेळी अनेकांच्या लक्षात आली होती.भाजप हा विखे यांच्या काठीने सहकारातील दुसरा सहकारी मारू पाहत असल्याचे उघड झाले होते.

दरम्यान काँग्रेसकडून आ.सुधीर तांबेंनी अर्ज न भरल्यानं मविआने जागांची अदलाबदल केली आणि नाशिकची जागा शिवसेनेकडे आली होती.शिवसेनेनं अपक्ष अर्ज दाखल केलेल्या शुभांगी पाटलांना पाठिंबा जाहीर केला होता.त्यामुळे शुभांगी पाटलांना अधिकृतपणे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला होता.त्यांनी आज दुपारी कोपरगाव येथील मतदान केंद्रात भेट दिली असून आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर आज हीं निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.आज सकाळी ०८ ते दुपारी बारा वाजे पर्यंत केवळ १०२५ पुरुष तर २६७ स्रिया असा एकूण ०१ हजार २९२ मतदारांनी म्हणजे १५.२६ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता हा सुशिक्षित व पदवीधर मतदारांच्या तुलनेने कमीच म्हटला पाहिजे.

दरम्यान दुपारी ०२ वाजता आलेल्या आकडेवारी प्रमाणे हि आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.०१ हजार ७१२ पुरुष तर ५१४ स्रिया असा एकूण ०२ हजार २२६ मतदारांनी म्हणजे २६.३० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

दुपारी ०२ ते ०४ वाजे पर्यंत आलेल्या आकडेवारी प्रमाणे हि आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.०२ हजार ५५४ पुरुष तर ८६६ स्रिया असा एकूण ०३ हजार ४२० मतदारांनी म्हणजे एकूण दिवसभरात ४०.४१ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

दरम्यान कोपरगाव सह अन्य ठिकाणी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपला ठिय्या दिलेला दिसून आला आहे.सदर परिस्थितीवर तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,वासुदेव देसले आदी अधिकारी नियंत्रण ठेवून होते.कुठेही अनुचित प्रकार घडल्याची माहिती प्राप्त झाली नाही.त्याबाबत प्रशासनास मतदार आणि कार्यकर्त्यानी धन्यवाद दिले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close