पणन
सत्तेची दुसरी खर्ची घ्या;पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कोल्हे गटाची भूमिका नेहमी शेतकरी विरोधी राहिली असून त्याला वर्तमान काळातील सत्ताधारी अपवाद नाही त्यांनी अनेक निर्णय शेतकरी विरोधी घेतले असून आताही त्यांनी उपसभापती पदाची खुर्ची घ्यावी पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे असे आवाहन कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काळे गटाचे माजी उपसभापती गोवर्धन परजणे यांनी केले आहे.

“कोल्हेंची भूमिका नेहमीच शेतकरी विरोधी राहिली आहे.परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ अडीच किलोमीटर पर्यंतच पाटपाणी मिळत आहे,तीन वेळा वाहून गेलेला दुर्लक्षित मंजूर बंधारा,शेतकऱ्यांच्या हक्काच्या निळवंडे आणि उजनीच्या पाण्याबाबत दुट्टपी भूमिका,कोपरगाव तालुक्याचे हक्काचे तालुक्याबाहेर घालाविलेले १३२ के.व्ही.सबस्टेशन आदी पराक्रम त्यांचे नावावर असून त्यांनी त्यातून कोणताही बोध न घेता त्याचीच पुनरावृत्ती बाजार समितीच्या कारभारातून पुढे सुरु आहे हे दुर्दैवी आहे”-गोवर्धन परजणे,माजी उपसभापती,कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वकाही अलबेल नाही; काही तरी गैरव्यवहार असून आ.कोल्हे गट वगळता अन्य गटांनी दि.06 जून रोजी बहिष्काराचे अस्त्र बाहेर काढले होते.यातील आ.आशुतोष काळे गटाच्या पाच संचालकांनी आपले राजीनामे सोपवले असल्याचे उघड झाल्याने आगामी काळात कृषी उत्पन्न बाजार समिती राजकीय आखाडा बनणार असल्याचे उघड झाले असून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.तर अद्याप राजेश परजणे आणि नितीन औताडे गटाने हातची घडी आणि तोंडावर बोट ठेवून मौन पाळले असून त्यांचे “थांबा…,पहा… आणि…’जा’ चे धोरण कुठपर्यंत सुरू राहणार असा सवाल निर्माण झाला आहे.कदाचित काळे-कोल्हे एकच नाण्याच्या दोन बाजू असाव्या” असा त्यांचे पक्का समज असावा त्यामुळे ही लुटुपुटूची लढाई खरी की खोटी याची चाचपणी ही मंडळी करत असावी असा कयास असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान आगामी काळात कोण किती पाण्यात आहे यावर त्यांची भूमिका ठरणार असल्याचे दिसत आहे.या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे गटाने आ.कोल्हे गटावर आरोपांच्या तोफा डागण्यास सुरुवात केली आहे.त्याच बरोबर मोर्व्रिस या ठिकाणी अनौपचारिक उपबाजार सुरू करून त्याची सुरुवात केली आहे.त्यानंतर त्यांनी त्या बाबत माजी उपसभापती गोवर्धन परजणे यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की,”पश्चिम भागातील व पोहेगाव परिसरातील ११ गावातील शेतकरी तुमचा निषेध करीत असल्याने तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे.त्यामुळे तुम्ही नेत्याच्या सांगण्यावरून प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस देत आहे.आपण वर्षापूर्वी सोडलेल्या उपसभापतीच्या खुर्चीवरही तुम्ही बसा.मात्र निर्णय शेतकरी हिताचे घ्या.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या मोर्विस व रांजणगाव देशमुख उपबाजार समित्यांचे भूमिपूजन होवूनही सव्वा वर्षात या उपबाजार समित्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत.पोहेगावची बाजार समिती फक्त कागदावरच मंजूर आहे.त्यामुळे उपसभापतीच्या खुर्चीला कोल्हे गटाच्या विद्यमान सदस्याच्या नावाची पाटी लावून कोल्हे गटाला जबाबदारीची जाणीव करून दिली असल्याचे समजले जात आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”आम्हाला आणि आमच्या नेत्याला खुर्चीची हाव नाही.शेतकरी हित जपले जावे या उद्देशातून आम्ही कारभार करीत आलो आहे.आमच्या मोठेपणामुळे तुम्हाला सभापतीची खुर्ची मिळाली.तुम्ही त्याचा गैरवापर केला.सभापती साहेबराव रोहोम हे कोल्हेंच्या नेतृवाखाली प्रभावीपणे भ्रष्टाचाराचे करीत असलेले रेकॉर्ड आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो.त्यामुळे आम्ही स्वतःहून सामुहिक राजीनामे दिले.आम्हाला जर खुर्चीची आशा-अपेक्षा असती तर आम्ही सामुहिक राजीनामे कशाला दिले असते? तुमच्यावर अविश्वास ठराव आणला असता.आम्हाला तुमच्यासारखी खुर्चीची हाव नाही.आमच्यासाठी शेतकऱ्यांचे हित हिच आमची मोठी खुर्ची आहे.



