जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

मंदिर परिसरात सुरक्षारक्षक नेमण्यात यावे-पोलीस निरीक्षक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर हद्दीत असलेल्या मंदिर व्यवस्थापन समितीने आपल्या मंदिरांची व मंदिर दान पेट्यांची व्यवस्था जपण्यासाठी संबधीत ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावे व प्रतिबंधात्मक उपाय योजावे असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव येथील एका बैठकीत केले आहे.

कोपरगाव शहर हद्दीत वारंवार होणाऱ्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसांनी नुकतीच जनजागृतीसाठी मंदिर प्रशासनाची बैठक घेतली असून त्यासाठी विविध मान्यवर उपस्थित होते.त्याबाबत त्यांनी विविध सूचना देताना ते बोलत होते.

सदर प्रसंगी शुक्राचार्य मंदिरात विश्वस्त समितीचे बाळासाहेब आव्हाड,भाजपचे माजी शहराध्यक्ष महावीर दगडे,शिवसेनेचे भैय्या तिवारी,रविंद्र सोमोसे,संत जनार्दन स्वामी आश्रमाचे व्यवस्थापक विजय जाधव,स्वच्छता दूत सुशांत घोडके,विघ्नहर मंदिराचे खैरे,श्री चव्हाण,श्री.आढाव,आदिसंह बहुसंख्य विश्वस्त व मान्यवर उपस्थित होते.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात अधूनमधून भुरटे चोरटे आपले डोके वर काढत असतात.त्यामुळे शहरतील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत असते.अशीच घटना नुकतीच निवारा परिसरात घडली असून या प्रकरणी फिर्यादी कमल कांकरिया या निवारा परिसरातील रहिवासी असून त्या आपल्या कुटुंबासमवेत दि.१३ जानेवारी रोजी बाहेरगावी गेल्या होत्या.त्यावेळी त्यांच्यावर अज्ञातच चोरट्यांनी पाळत ठेवून डल्ला मारला आहे.हि बाब आज सकाळी दि.२१ जानेवारी रोजी सकाळी ०६ वाजेच्या सुमारास आल्या असता त्यांच्या घराचा काडी व कोयंडा तोडलेल्या स्थितीत आढळून आला होता त्यावेळी उघड झाली आहे.त्यातील सुमारे ५० हजारांचा ऐवज लंपास केला होता.या शिवाय मंदिरे सुरक्षित राहिले नाही.उपकारागृहात कैदी एकमेकांत हाणामाऱ्या करत आहे.भ्रमणध्वनींसह त्यांना सर्व काही सुखसोयी सुखनैव मिळत असल्याचा बातम्या आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभुमीवर हि बैठक संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी केले तर उपस्थितांचे आभार राम खारतोडे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close