जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

एका महिन्यात तळ्यातील पाणी संपले कसे?

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  मागील आवर्तनात १५ मे रोजी शहराला पाणी पुरवठा करणारे पाचही तळे पूर्ण क्षमतेने भरण्यात आले असताना अवघ्या एका महिन्यात या पाचही तळ्यांनी तळ कसा गाठला? पालिकेच्या पाचही तलावातील पाणी नेमके गेले कुठे? असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी केला आहे.

कोपरगाव शहर साठवण तलाव.

“गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्यात आले असून शहराला पाणी पुरवठा करणारे पाचही तळे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आली असल्याचा दावा नगराध्यक्ष संधान यांनी केला होता.मात्र मागील महिन्यातही १५ मे रोजी पाणी पुरवठा करणारे १ ते ५ साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेतली असतांना देखील एकाच महिन्यात सर्व साठवण तलाव कसे काय रिकामे झाले ? हे पाणी जाते कुठे हे न सुटणारे कोडे बनले आहे’-वाल्मीक लहिरे,नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.

   कोपरगाव नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा समितीची बैठक पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षा वैशाली वाजे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी पार पडली असून या बैठकीत पाणी पुरवठा समितीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य वाल्मिक लाहीरे यांनी पाणी पुरवठ्या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावेळी ते बोलत होते.

वाल्मीक लहिरे.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ऐन उन्हाळ्यात कोपरगावकरांना पिण्याच्या पाण्याची अडचण होवू नये यासाठी आ.आशुतोष काळे यांनी तातडीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देवून गोदावरी कालव्यांना पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्यामुळे गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्यात आले असून शहराला पाणी पुरवठा करणारे पाचही तळे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आली असल्याचा दावा केला आहे.मात्र मागील महिन्यातही १५ मे रोजी पाणी पुरवठा करणारे १ ते ५ साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेतली असतांना देखील एकाच महिन्यात सर्व साठवण तलाव कसे काय रिकामे झाले ? हे पाणी जाते कुठे हे न सुटणारे कोडे आहे.त्यामुळे यापुढील काळात कोपरगावकरांना पाणी टंचाई जाणवू नये यासाठी पाण्याचा वापर जपून करावा.कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.त्यामुळे ही पाणी गळती तातडीने बंद करावी.तसेच पाणी पुरवठा विभागात रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत त्यांची न्यायालयीन लढाई सुरु असून त्याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने सहानुभूतीने विचार करून त्यांना कायमस्वरूपी कोपरगाव नगरपरिषदे सेवेत सामावून घ्यावे.अशा सूचना राष्ट्रवादीचे पाणी पुरवठा समितीकचे सदस्य नगरसेवक लहिरे व नगरसेविका स्मिता साबळे यांनी पाणी पुरवठा समितीच्या बैठकीत केल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close