जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

रस्ता अपघातात दोन तरुण ठार,तीन जखमी !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाट्यानजिक वणी येथून दर्शन करून आपल्या घरी जात असताना मारुती इको वरील  (क्रं.एम.एच.४२ बी.बी.१६९४) नियंत्रण सुटल्याने राहाता तालुक्यातील तिसगाव प्रवरा येथील तरुण ऋषिकेश मधुकर कडू (वय-२५)व संदीप बाबासाहेब सदाफळ (वय-३२) हे दोन जण ठार झाले असून लक्ष्मण बाळासाहेब सदाफळ,योगेश भीमराव कणसे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.यातील जखमी कणसे यांचेवर संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचार सुरू आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  

यातील मयत तरुण आणि त्याचे सहकारी हे पाच जण आपल्या ताब्यातील मारुती इको या गाडीने वणी येथे तीर्थक्षेत्रात दर्शन घेऊन आपल्या घरी येत असताना शिर्डी लासलगाव रस्त्यावर गवळी वस्तिजनिक असलेल्या वळणावर चालक ऋषिकेश कडू याचे गाडीवरील नियंत्रण सुटले होते.त्यामुळे सदर गाडी ही अनेक पलट्या मारून खोल खड्ड्यात जाऊन पडली होती.

   कोपरगाव तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था अद्याप दूर होण्याचे नाव घेत नाही असे दिसत आहे.त्यामुळे वरचे वर अपघातात वाढ होताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच हांडेवाडी फाटा येथे उघड झाली आहे.यातील तरुण आणि त्याचे सहकारी हे आपल्या ताब्यातील मारुती इको या गाडीने वणी येथे तीर्थक्षेत्रात दर्शन घेऊन आपल्या घरी येत असताना शिर्डी लासलगाव रस्त्यावर गवळी वस्तिजनिक असलेल्या वळणावर चालक ऋषिकेश कडू याचे गाडीवरील नियंत्रण सुटले होते.त्यामुळे सदर गाडी ही अनेक पलट्या मारून खोल खड्ड्यात जाऊन पडली होती.ही घटना दिनांक १३ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

संकल्पित छायाचीत्र.

दरम्यान या अपघातात लक्ष्मण बाळासाहेब सदाफळ,योगेश भीमराव कणसे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.यातील जखमी कणसे यांचेवर कोपरगाव नजिक असलेल्या संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

त्याला नजीकच्या ग्रामस्थांनी उपचारार्थ रुग्णवाहिका चालक विलास निंबाळकर याचे सहाय्याने जखमींना कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.डिकले यांनी गाडी चालक ऋषिकेश कडू व संदीप बाबसाहेब सदाफळ त्यास मृत घोषित केले आहे.

   दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोलिस निरीक्षक संदीप कोळी व पो.हे.कॉ.मधुसूदन दहिफळे यांनी भेट दिली आहे.

   दरम्यान या प्रकरणी गोरक्ष संपत निबे (वय-३८) त्यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात याची खबर दिली होती.कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.०२/२०२४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सन-२०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दहिफळे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close