जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

कोकमठाण-रुई रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला,शेतकऱ्यांत समाधान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण (कारवाडी) ते रुई या शिवरस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी शिष्टाई करत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांशी चर्चा करून या रस्त्याचा प्रश्न निकाली काढला असून तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सर्व शेतकऱ्यांच्या समक्ष जवळपास एक किलोमीटरचा हा रस्ता तयार करण्यात आला आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम व कोकमठाण येथील शेतकऱ्यांनी आ.काळे यांना विनंती करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली होती.शेतकऱ्यांची होत असलेली अडचण ओळखून आ.काळे यांनी पुढाकार घेत सर्व शेतकऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे.

कोकमठाण (कारवाडी) ते रुई या शिवरस्त्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी चार-पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत असे.अनेक वर्षापासूनचा त्रास कायमचा कमी व्हावा यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम व कोकमठाण येथील शेतकऱ्यांनी आ.काळे यांना विनंती करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली होती.शेतकऱ्यांची होत असलेली अडचण ओळखून आ.काळे यांनी पुढाकार घेत सर्व शेतकऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेतल्या.शेतकऱ्यांचे प्रबोधन करून रस्ता तयार करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे एकमत केले.रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे कोणतेही मोठे नुकसान न होऊ देता सर्व शेतकऱ्यांच्या सहमतीतून अनेक वर्षांपासून वादग्रस्त असलेल्या कारवाडी (कोकमठाण) ते रुई शिवरस्ता नवीन १ किलोमीटर तयार वाहतुकीसाठी खुला झाला आहे.अनेक पिढ्यांपासून प्रलंबित असलेला वाद मिटून या रस्त्यावरून ट्रॅक्टर सह इतरही वाहने जावू शकतील एवढा मोठा रस्ता तयार झाला आहे.रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षाचा त्रास कमी होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोकमठाण प्रमाणे कोपरगाव मतदारसंघातील इतरही गावांमध्ये अशा प्रकारच्या रस्त्यांच्या अडचणी आहेत.या अडचणी दूर करून त्या ठिकाणी नवीन रस्ता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सामंजस्यपणाची भूमिका घेवून त्या शेतकऱ्यांनी देखील कोकमठाण येथील शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन आपल्या रस्त्याच्या समस्या सोडवाव्यात त्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन आ.काळे यांनी दिले आहे. हा रस्ता नकाशावर घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण करून देण्याचे आश्वासन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिले असून त्यामुळे रस्त्यावर शिक्कामोर्तब होऊन पुढील वाद टळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,उपसरपंच दीपक रोहोम,महेश लोंढे, प्रसाद साबळे, ज्ञानेश्वर रक्ताटे,सुनील साळुंके,दत्तात्रय हाडोळे,गोकुळ डांगे,जालिंदर हाडोळे,धोंडीराम रक्ताटे,दादासाहेव रक्ताटे,मधुकर रक्ताटे, अशोक बोंबे, दिनकर रोहोम, एकनाथ डांगे,विठ्ठलराव डांगे,राजेंद्र रोहोम,गणेश कथले,मधुकर रोहोम,तलाठी संदीप चाकणे,ग्रामसेवक डी.बी.गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close