कोपरगाव तालुका
कोळपेवाडीत अहिल्यादेवी यांची साकारली रांगोळी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूलचे कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सुबक रांगोळी साकारली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
“ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते,तसेच अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती.तिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते.अशी अहिल्यादेवी ही एक महान स्त्री होती.” “आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले आजही त्यांचा गौरव करण्याचा मोह अनेकांना होतो” त्यातील एक कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण हे आहे.
अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला.हा एक स्वप्नवत काळ होता.या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली.अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला.”ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते,तसेच अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती.तिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते.अशी अहिल्यादेवी ही एक महान स्त्री होती.” “आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले आजही त्यांचा गौरव करण्याचा मोह अनेकांना होतो त्यातील एक कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण हे आहे.त्यानी या महाराणीचे चित्र आपल्या कलेतून साकारले आहे.कोळपेवाडी गावच्या सांस्कृतिक वैभवात भर घालतांना चव्हाण विविध उपक्रम राबवित असतात आपल्या शिक्षकी पेशा बरोबरच गायन व पेंटींग क्षेत्रात चव्हाण यांचे नाव आहे.आपल्या कुंचल्यातून जलरंग पेंटींग तसे पेन्सिल रेखाटने ही चव्हाण यांची खासियत आहे.नुकतेच त्यांच्या यु ट्युब चॅनल वरून त्यांनी स्वरचित अहील्या थोर तुझे उपकार हे. गीत प्रसारीत केले आहे.अहील्यादेवींचे गाव अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे ही अभिमानास्पद बाब असुन हिच प्रेरणा घेऊन सदर रांगोळी रेखाटल्याचे त्यांनी सांगितले या रांगोळीच्या फोटोसोबतच समाजमाध्यमांवरून या कलेचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.