जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

…या तालुक्यात रस्ते विकासासाठी निधी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव मतदारसंघात ग्रामीण मार्गासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४.०५ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे.या निधीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास होऊन शेतकरी,विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतुकीच्या समस्या कायमच्या सुटणार असल्याचा दावा आ.आशुतोष काळे यांनी केला आहे.

जिल्हा नियोजन समितीतून कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे प्रजीमा ८४ ते तालुका हद्द रस्ता करण्यासाठी ४० लाख,कुंभारी येथे इजिमा १२३ रावसाहेब बढे वस्ती ते सुभाष बढे वस्ती रस्त्यासाठी २० लाख,माहेगाव देशमुख येथे भास्कर लांडगे वस्ती ते ग्रामा १०१ पर्यंतच्या रस्त्यासाठी ५० लाख,रवंदे येथे ५ चारी ते काळधोंडी नदी रस्ता ४० लाख,वारी येथे वारी ते जिल्हा हद्द खोपडी रस्ता ५० लाख,मढी बु. येथे वॉटर सप्लाय ते पाथरे शिव रस्ता २० लाख,वाकडी येथे गोदावरी उजवा कालवा ते जाधव-पानसरे वस्ती रस्ता ४० लाख,तळेगाव मळे येथे तळेगाव ते उक्कडगाव रस्त्यासाठी ४५ लाख,तिळवणी येथे तिळवणी ते खामगाव रस्त्यासाठी ३० लाख, धारणगाव येथे प्रजिमा ५ ब्राम्हणगाव फाटा ते प्रजिमा २१६ पर्यंतच्या रस्त्यासाठी ४० लाख,सुरेगाव येथे सुरेगाव गावठाण ते वेळापूर रस्त्यासाठी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

   कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था निर्माण झाली असून यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.त्यासाठी कोपरगाव विधानसभेचे आ.आशुतोष काळे यांनी निधीसाठी प्रयत्न सुरू केला आहे.त्याच्या या प्रयत्नाला यश येताना दिसत असल्याचे दिसत आहे.त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी ४.०५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळवली आहे.यातून काकडी येथे प्रजीमा ८४ ते तालुका हद्द रस्ता करण्यासाठी ४० लाख,कुंभारी येथे इजिमा १२३ रावसाहेब बढे वस्ती ते सुभाष बढे वस्ती रस्त्यासाठी २० लाख,माहेगाव देशमुख येथे भास्कर लांडगे वस्ती ते ग्रामा १०१ पर्यंतच्या रस्त्यासाठी ५० लाख,रवंदे येथे ५ चारी ते काळधोंडी नदी रस्ता ४० लाख,वारी येथे वारी ते जिल्हा हद्द खोपडी रस्ता ५० लाख,मढी बु. येथे वॉटर सप्लाय ते पाथरे शिव रस्ता २० लाख,वाकडी येथे गोदावरी उजवा कालवा ते जाधव-पानसरे वस्ती रस्ता ४० लाख,तळेगाव मळे येथे तळेगाव ते उक्कडगाव रस्त्यासाठी ४५ लाख,तिळवणी येथे तिळवणी ते खामगाव रस्त्यासाठी ३० लाख, धारणगाव येथे प्रजिमा ५ ब्राम्हणगाव फाटा ते प्रजिमा २१६ पर्यंतच्या रस्त्यासाठी ४० लाख,सुरेगाव येथे सुरेगाव गावठाण ते वेळापूर रस्त्यासाठी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीतून मतदारसंघातील रस्ते मजबूत होणार असून परिसरातील शेतकरी,विद्यार्थी आणि नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी दूर होऊन विकासाला चालना मिळणार असल्याचा दावा आ.काळे यांनी केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close